Amruta Khanvilkar चा फिटनेस फ्रिक मूड पाहून चाहते झाले फिदा, See Viral Pics
Amruta Khanvilkar Workout (photo Credits: Instagram)

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. आपल्या पतीसोबत, कुटूंबासोबत केलेली धमालमस्ती ती सोशल मिडियावर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वर्कआऊट करतानाचे फोटोज शेअर केले आहेत. यात तिचा ग्लॅमरस फिटनेस मूड (Fitness Mood) तिचे चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. हे फोटोज सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. योगा, व्यायाम आणि आहार यांचा समतोल साधत अमृता खानविलकर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याकडे लक्ष देत आहे.

या फोटोजमध्ये अमृता योगाचा सराव करताना दिसत आहे. यात तिचे योगाचे वेगवेगळे प्रकार पाहून तिचे चाहतेही अवाक झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

‘वाजले की बारा’ म्हणत मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारी, सोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या ‘राझी’ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिकणारी अभिनेत्री अमृता खानविलकरही फिट राहण्याकडे नेहमी कटाक्षाने लक्ष देते.हेदेखील वाचा- Sonalee Kulkarni च्या पुण्याच्या घरात अज्ञाताचा घुसण्याचा प्रयत्नात तिच्या वडिलांवर चाकूहल्ला; आरोपी निगडी पोलिसांच्या ताब्यात

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

वर्क आऊट सोबतच योगा करण्यावर अमृताचा अधिक भर असतो. हे फोटो तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी देखील या फोटोजला कमेंट्स केले आहेत. करिश्मा तन्ना, सखी गोखले, क्रांती रेडकर, सोनाली खरे, सायली संजीव, नीना कुलकर्णी अशा अनेक सेलिब्रिटीज तिच्या या फोटोमधील योगा कौशल्याचे कौतुक केले आहे.