66th National Film Awards 2019: वाचा नाळ चित्रपटातील बाल कलाकार 'श्रीनिवास पोकळे' याच्या काही मजेशीर गोष्टी

चित्रपटात श्रीनिवासने चैतन्यची मुख्य भूमिका साकारली आहे आणि याच भूमिकेसाठी त्याला आज नॅशनल अवॉर्ड (66th National Film Awards 2019 winner) देखील मिळाले आहे.

Shrinivas Pokale (Photo Credits: Twitter, Instagram)

National Film Awards Winner Shrinivas Pokale: नाळ हा चित्रपट पाहिल्यावर त्यातील खोडकर असा बाल कलाकार म्हणजेच श्रीनिवास पोकळे याच्या कोणीही प्रेमात पडेल. Sudhakar Reddy Yakkanti दिग्दर्शित नाळ या हृदयस्पर्शी चित्रपटात त्याने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटात श्रीनिवासने चैतन्यची मुख्य भूमिका साकारली आहे आणि याच भूमिकेसाठी त्याला आज नॅशनल अवॉर्ड (66th National Film Awards 2019 winner) देखील मिळाले आहे. तर आजच्या या खास दिवशी जाणून घेऊया श्रीनिवासबद्दल काही मजेशीर गोष्टी.

25 जून 2010 रोजी श्रीनिवासचा जन्म झाला. तो त्याच्या कुटुंबासोबत मुंबईत राहतो. हा खोडकर मुलगा  सध्या पाचवीत शिकत आहे आणि अभ्यासासोबतच क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांमध्ये त्याला खूप रस आहे. इतकंच नव्हे तर तो एक अप्रतिम डान्सरसुद्धा आहे.

त्याच्यात दडलेल्या उत्तम कलाकाराचा शोध घेतला आहे सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी. नंतर त्यांनीच त्याला नाळ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी प्रोत्साहित केले. या चित्रपटात नागराज त्याच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत आणि खऱ्या आयुष्यात देखील ते त्याला आपला मुलगाच मानतात.

विशेष म्हणजे श्रीनिवास हा चित्रपटाच्या शूटिंग आधीही रांगड्या शैलीतच बोलायचा त्यामुळे चित्रपटासाठी त्याला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.

66th National Film Awards 2019: अक्षय कुमार, विक्की कौशल, आयुष्मान खुराना हे परस्काराचे मानकरी (Watch Videos)

दरम्यान, आज पार पडलेल्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्स 2019 (66th National Film Awards 2019) या सोहोळ्यात, ओंडल्ला एरदल्लासाठी पी व्ही रोहीथ, नाळसाठी श्रीनिवास पोकळे, हरजितासाठी समीप रानौत आणि हमीदसाठी तल्हा अर्शद रेशी या चौघांना सर्वोत्कृष्ट बाळ कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif