Bigg Boss च्या घरात प्रवेश करणारी Hot आणि Sexy हीना पांचाळ नक्की आहे कोण? (Photos)
आयटम साँगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हीनाचा जन्म, 3 एप्रिल 1990 रोजी मुंबई येथे झाला. हीनाने अनेक हिंदी, मराठी तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये हिट आयटम साँग दिले आहेत.
सध्या बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 2) घरातील वातावरण अतिशय तापलेले आहे. एकीकडे पराग आणि वीणामधील भांडण शिगेला पोहचत आहे, तर दुसरीकडे कायद्याची भाषा वापरल्याने शिवानीला घरातून हाकलण्यात आले आहे. यासर्वांमध्ये बिग बॉसच्या घरात पहिली Wild Card Entry झाली आहे. अभिनेत्री, नर्तकी हीना पांचाळ (Heena Panchal) हिने सध्याचे वातावरण अजून गरम करण्यासाठी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. प्रवेश करताना नृत्य सादर केल्यानंतर जेव्हा हीनाने बोलायला सुरुवात केली, त्यावेळी तिचे मराठी ऐकून अनेकांचा हिरमोड झाला. हीनाने याआधी अनेक दक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केल्याने त्या भाषेचा प्रभाव तिच्या भाषेवर जाणवतो. तर चला पाहूया कोण आहे ही हीना.
हीनाने याआधी अनेक आयटम नंबरवर (Item Songs) आपल्या नृत्याच्या अदा दाखवल्या आहेत. आयटम साँगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हीनाचा जन्म, 3 एप्रिल 1990 रोजी मुंबई येथे झाला. हीनाने अनेक हिंदी, मराठी तमिळ आणि तेलुगु चित्रपटांमध्ये हिट आयटम साँग दिले आहेत.
बालम बंबई (Balam Bambai) आणि बेवडा बेवडा झालो मी टाईट (Bevda Bevda Zalo Mi Tight) या दोन गाण्यांनी तिला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. 2015 मध्ये फोर्ब्स इंडिया च्या टॉप -100 सेलिब्रिटी लिस्ट मध्ये हीनाला स्थान मिळाले होते.
हीना ही बॉलिवूड अभिनेत्री मलाइका अरोड़ासारखी दिसत असल्याने अनेक लोक तिला ओळखण्यात चुकही करतात. बॉम्बे टाइम्स मासिकाने हीनाला आयटम गर्ल्स च्या यादीमध्ये 7 वे स्थान दिले होते.
हीना ही फिटनेस फ्रिक असून, ती सोशल मिडीयावरही फारच सक्रीय असते. आपल्या हॉट आणि सेक्सी फोटो शूटमुळे हीना याआधी अनेकदा चर्चेत आली आहे.