Four More Shots Please वेबसीरीज चा दुसरा सीझन 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला (Watch Trailer)
फोअर मोर शॉट्स प्लीज (Four More shots Please) या प्रसिद्ध वेबसिरीजचा दुसरा सीझन येत्या एप्रिल महिन्यात 17 तारखेला ऍमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर प्रदर्शित होणार आहे.
फोअर मोर शॉट्स प्लीज (Four More shots Please) या प्रसिद्ध वेबसिरीजचा दुसरा सीझन येत्या एप्रिल महिन्यात 17 तारखेला ऍमेझॉन प्राईम (Amazon Prime) वर प्रदर्शित होणार आहे. या सीरीजचा पहिला सीझन गाजल्यांनंतर आता दुसया सीझन मध्ये काय वेगळं पाहायला मिळणार याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. याची एक छोटीशी झलक ट्रेलरच्या माध्यमातून शेअर करण्यात आली आहे.सयानी गुप्ता (Sayani Gupta), किर्ती कुल्हारी (Kirti Kulhari) , बानी जे (Bani J) , मानवी गगरू (Manvi Gagru) , लिसा रे (Lisa Ray) , प्रतिक बब्बर (Pratik Babbar) , मिलिंद सोमण (Milind Soman) आणि इतर कलाकारांच्या यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नुपुर अस्थानाने (Nupur Asthana) या सिझनचं दिग्दर्शन केलं आहे. रामायण, महाभारत यानंतर आता 'शक्तिमान' शो पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला? मुकेश खन्ना यांच्या Viral Video मधून खुलासा
जर का तुम्ही या सीरिजचा पहिला सीझन पहिला असेल, तर तुम्हाला याच्या कथानकाची कल्पना असेल. मुंबई मध्ये चार वेगळ्या व्यवसायात असणाऱ्या चार महिला त्यांच्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक अडचणींना कशा प्रकारे तोंड देतात आणि याच सगळ्या खटाटोपात त्यांची एकमेकींशी ओळख होऊन त्यांची फ्रेंडशिट त्यांना कसे बळ देते हे या सिरीज मध्ये दाखवण्यात आले आहे. आता दुसऱ्या सीझन मध्ये या चार मैत्रिणी पुन्हा एकदा इस्तंबूल (Istanbul) या देशात भेटून आताचे त्यांचे जीवन काय आणि कसे सुरु आहे हे दाखवतात. या दुसऱ्या सिझनची एक झलक इथे पहा.
Four More Shots Please सीझन 2 ट्रेलर
दरम्यान, 17 एप्रिल रोजी हा सीझन ऍमेझॉन प्राईम वर प्रदर्शित करण्यात येईल. हिंदी, तेलुगु आणि तामिळ या भाषांमध्ये तब्बल 200 देशात हा सीझन प्रदर्शित केला जाणार आहे. सध्या इंस्टाग्राम, युट्युब सहित सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या सीझन चा ट्रेलर पाहायला मिळत आहे. त्यावर सुद्धा अनेकांनी कमेंट्स आणि लाईक्स मधून उत्साह दाखवून दिला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)