प्रिया-उमेशच्या गुडन्यूजचा अखेर उलघडा; Priya Bapat ची निर्मिती असलेलं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर

काही दिवसांपूर्वी प्रियाने एक गुड न्यूज आहे, असे लिहित उमेशसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर प्रिया-उमेशच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

प्रिया-उमेशच्या गुडन्यूजचा अखेर उलघडा; Priya Bapat ची निर्मिती असलेलं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर
उमेश कामत-प्रिया बापट (Photo Credit: Instagram)

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असून ती नेहमीच अपडेट्स शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी प्रियाने "एक गुड न्यूज आहे," असे लिहित उमेशसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर प्रिया-उमेशच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण आहे प्रियाची नवी इंस्टा पोस्ट. नवीन पोस्ट करत प्रियाने ही गुड न्यूज नक्की काय आहे, हे स्पष्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

एक गुड न्यूज आहे. #feelingblessed

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

मालिका, नाटक, सिनेमा अशा विविध माध्यमातून आपण प्रियाचा अभिनय पाहिला आहे. मात्र आता प्रिया निर्मिती क्षेत्रात पर्दापण करत आहे. प्रिया बापट निर्मिती 'दादा, एक गुड न्यूज आहे,' हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. प्रिया या नाटकाची निर्मिती करत असून उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे यात प्रमुख भूमिकेत आहेत. यात उमेश-ऋता बहिण भावाची भूमिका साकारत आहेत. कल्याणी पाठारे यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर करत आहे.

 

View this post on Instagram

 

तर ही आहे गुड न्यूज! सोनल प्रोडक्शन्ससह आमची पहिली निर्मिती. खूप मनापासून, प्रेमाने जपलेली आणि वाढवलेली ही पहिली कलाकृती लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. आजपर्यंत अभिनेते म्हणून तुम्ही आमच्यावर खूप प्रेम केलंत, तसंच आमच्या या नव्या प्रवासाला सुध्दा तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळू देत. This is the ‘GOOD NEWS’. This is our baby. There is no greater happiness than producing and supporting the content that you believe in. Umesh and I have been blessed with tremendous love and support from our family, friends and fans over the years. We wish to seek your blessings for this new journey. Wish us all the luck and shower your love upon this one too! #DadaEkGoodNewsAhe

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

'आम्ही दोघी', ' टाईमपास 2', 'वजनदार', 'हॅपी जर्नी' यांसारख्या अनेक हिट सिनेमात काम केल्यानंतर नाटक निर्मितीचा प्रियाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2018 12:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).