Devi Trailer: काजोल, नीना कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सह 9 अभिनेत्रींच्या 'देवी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित; एका घरात अडकून पडलेल्या नऊ महिलांची कथा मांडणारा अनोखा प्रयत्न (Watch Video)

यामध्ये वेगवेगळ्या भागातून आलेल्या आणि वेगळ्या विचारसरणीच्या 9 महिला एकत्र येऊन त्यांच्यात घडणारा संवाद पाहायला मिळणार आहे,

Devi Movie Trailer (Photo Credits: Youtube)

दोन बायका एका छताखाली आल्या की भांडणं निश्चित अशी एक जुनी म्हण तुम्ही ऐकली असेल मात्र देवी (Devi)  या नव्या कोऱ्या आगामी सिनेमात अशीच काहीशी थीम घेऊन एक वेगळा प्रयत्न केला गेला आहे. यामध्ये वेगवेगळ्या भागातून आलेल्या आणि वेगळ्या विचारसरणीच्या 9 महिला एकत्र येऊन त्यांच्यात घडणारा संवाद पाहायला मिळणार आहे, नुकताच या देवी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून काहीच तासांमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे यात पहिल्यांदाच बॉलिवूड (Bollywood), मराठी चित्रपट (Marathi Cinema), वेबसिरीज (Web Series) आणि अन्य माध्यमातील 9 विविध अभिनेत्री एकत्र पाहायला मिळणार आहेत, यात काजोल (Kajol), नीना कुलकर्णी (Neena Kulkarni) , मुक्ता बर्वे (Mukta Barve), नेहा धुपिया (Neha Dhupia), श्रुती हासन (Shruti Hasan) , संध्या म्हात्रे (Sandhya Mhatre), रमा जोशी (Rama Joshi), शिवानी रघुवंशी (Shivani Raghuvanshi) आणि यशस्विनी दयामा (Yashasvini Dayama) या 9 अभिनेत्रींचा समावेश असेल.

देवी सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हाला नक्कीच एका शो ची आठवण येईल तो म्हणजेच बिग बॉस, ज्याप्रमाणे बिग बॉस मध्ये भिन्न माणसे एका घरात अडकलेली असतात, त्यांच्यात भांडणातून संवाद होतो, प्रत्येकाची एक कथा उलगडत जाते तसाच प्रकार देवी मध्ये सुद्धा दिसून येणार आहे, हो मात्र फरक असा कि यातील कथा या महिलांच्या संघर्षाला पुढे आणणाऱ्या असतील, ट्रेलर मध्येच याची झलक पाहायला मिळते. ट्रेलरच्या शेवटी काजोल आपण याठिकाणी अडकण्याचा आधी किती घाबरलेले होतो असे म्हणते ज्यातून या सिनेमात या सर्व महिलांची योगायोगाने झालेली भावनिक जवळीक दिसून येईल असा अंदाज आहे, वेगवेगळ्या वयोगटातील, वेगळ्या माध्यमात काम केलेली ही मंडळी एकत्र येऊन नेमका कोणता मास्टरपीस बनतोय याची एक झलक पाहुयात..

देवी ट्रेलर

देवी सिनेमा हा एक लघुपट असणार असून या माध्यमातून काजोल आणि श्रुती हसन आपला डिजिटल डेब्यू करणार आहेत, या चित्रपटाचे शूटिंग फक्त दोन दिवसात झाले असून, याची निर्मिती निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन यांनी केली आहे. प्रियंका बॅनर्जी यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 2 मार्च ला हा लघुपट प्रदर्शित होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif