Colors Marathi Awards 2019: कलर्स मराठी अवॉर्ड्सच्या पहिल्या वर्षात कोण कोण ठरले पुरस्काराचे मानकरी?

कोणते कुटुंब ठरले सगळ्यात लोकप्रिय, कोणती जोडी ठरली लोकप्रिय ? कोणत्या कलाकारांनी पटकवला लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री होण्याचा मान ? बघूया कोण कोण ठरलेत या पुरस्कारांचे विजते.

"कुटुंब" म्हटलं की सुख दुःखात साथ ही आलीच. कुटुंबामध्ये जिव्हाळा, प्रेम, माया, रूसवे – फुगवे हे पण आलेच. प्रेक्षकांवर अनेक वर्षांपासून विविध रंगाची उधळण करत असलेले मनोरंजन विश्वातील एक कुटुंब ज्याने रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये बहुरंगी मनोरंजन कार्यक्रमामधून अल्पावधीतच आपली विशेष ओळख निर्माण केली आणि प्रेक्षकांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले, ते कुटुंब म्हणजे “कलर्स मराठी”(Colors Marathi). मालिकांतील व्यक्तिरेखांशी रसिकांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. किंबहुना या व्यक्तिरेखा महाराष्ट्राच्या घराघरातील अत्यंत महत्त्वाच्या भाग बनल्या आहेत. आता हेच ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी कलर्स मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे ''सोहळा कुटुंबाचा, आपल्या माणसांचा''- कलर्स मराठी अवॉर्ड 2019 (Colors Marathi Awards 2019). कोणते कुटुंब ठरले सगळ्यात लोकप्रिय, कोणती जोडी ठरली लोकप्रिय ? कोणत्या कलाकारांनी पटकवला लोकप्रिय अभिनेता आणि अभिनेत्री होण्याचा मान ? बघूया कोण कोण ठरलेत या पुरस्कारांचे विजते.

(हेही वाचा. Colors Marathi Awards 2019: पहा कलाकारांचा हा हटके Red Carpet लुक या क्षणचित्रांतून)

पहिल्यावहिल्या कलर्स मराठी अवॉर्डमध्ये 'लोकप्रिय मालिका' या विभागाच्या स्पर्धेत चांगलीच चुरस रंगली पण 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेने लोकप्रिय मालिकेचा मान पटकावला.

'लोकप्रिय नायक' आणि 'लोकप्रिय नायिके' चा मान 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' मालिकेतील सिद्धार्थ आणि अनुश्रीला मिळाला.

तर 'लोकप्रिय कुटुंब' ठरलं 'जीव झाला येडापिसा' मालिकेमधील लष्करे कुटुंब.

'लोकप्रिय नकारात्मक स्त्री व्यक्तिरेखा' (विभागून) देण्यात आले 'घाडगे & सून' मधील वसुधा आणि 'जीव झाला येडापिसा' मालिकेतील मंगल.

'लोकप्रिय नकारात्मक पुरुष व्यक्तिरेखा' चा मान 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेतील पंच यांना मिळाला.

'लोकप्रिय शीर्षकगीत' ठरलं 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' चं शीर्षकगीत.

'लोकप्रिय सूत्रसंचालक' ठरले बिग बॉस या प्रसिद्ध शोचं सूत्रसंचालन करणारे महेश मांजरेकर.

'लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम' हा पुरस्कार प्रेक्षकांच्या कानाचा आणि मनाचा ठाव घेतलेल्या 'सूर नवा ध्यास नवा'ला मिळाला.

सोबतच काही विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

या सोहळ्याचं सूत्रसंचालन 'जीव झाला येडापिसा' मालिकेतली मंगल म्हणजेच चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन या जोडीने केले आहे. कलर्स मराठी वरील हा कुटुंबाचा आपल्याला 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पाहायला मिळणार आहे.