Who is Sapna Gill: कोण आहे सपना गील? जिने घेतला Prithvi Shaw सोबत पंगा

सपना गिल ही सोशल मिडीया इन्फ्यूएंसर असून इन्स्टाग्रामवर तिझे 2 लाख 20 हजार फॉलअर्स आहेत. सोबतच तिने रवि किशनसोबत भोजपुरी चित्रपट देखील केला आहे.

Who is Sapna Gill: कोण आहे सपना गील? जिने घेतला Prithvi Shaw सोबत पंगा
Sapna Gill Instagram

मुंबईच्या स्टार हॉटेलच्या बाहेर क्रिकेटर पृथ्वी शॉ (prithvi Shah) आणि सपना गिल (sapna gill) यांच्यामद्ये वाद झालेला पहायला मिळाला होता. पृथ्वी शॉने वारंवार सेल्फी घेण्याची सपना गिल आणि तिझ्या मित्रांची मागणी धुडकावल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. या वादाचे व्हिडीयो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) झाले. या व्हिडीयोत सपना गिल ही पृथ्वी शाह सोबत भांडताना दिसत असून बेसबॉलच्या बॅटने त्याच्या मित्राच्या कारवर हल्ला करताना देखील दिसत आहे. या प्रकरणी ओशीवरा पोलिसांनी सपना गिलला ताब्यात घेतले असून आठ जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. (Prithvi Shaw: क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याच्यासोबत सेल्फीवरुन वाद, मुंबई पोलिसांकडून 8 जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा)

या प्रकरणातील सपना गिल ही स्वत: मोठी सोशल मिडीया इन्फुएंसर असून इंस्टाग्रामवर तीचे 2 लाख 20 हजार फॉसोअर्स आहेत. यासोबतच तीने भोजपुरी चित्रपटात काम देखील केले आहे. रवि किशन आणि दिनेश लाल यादव यांच्यासोबतचा काशी अमरनाथ हा सपना गिलचा चित्रपट फार गाजला होता. यासोबतच सपनाही हिंदी म्यूझीक व्हिडीयो अल्बम बसेरा आणि पंजाबी व्हिडीयो अल्बम जट्टीनाल होऊगी यामध्ये देखील ती दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Gill (@sapnagillofficial)

पृथ्वी शॉ याच्यासोबत आशिष यादव आणि त्यांचे मित्र बुधवारी दुपारी सांताक्रुझ विमानतळावर असलेल्या सहारा स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. याच वेळी सपना गिल व शोबित ठाकूर हे तेथे आले. त्यांनी पृथ्वी शॉ याच्यासोबत सेल्फी काढण्याचा आग्रह केला. शॉ यानेही सेल्फी काढला. मात्र, हे दोघे पुन्हा पुन्हा सेल्फी काढण्याचा आग्रह करु लागले. या वेळी हॉटेल व्यवस्थापकाने या दोघांना हटकले आणि हॉटेलबाहेर काढले. त्यामुळे संतापलेल्या सपना गिल व शोबित ठाकूर यांनी आपल्या इतर साथीदारांनाही तेथे बोलावले आणि आशिष यादव आणि पृथ्वी शाह यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती.

(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2023 02:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).