‘बॉलिवूड मध्ये दादागिरी खपवून घेणार नाही, अन्याय होणाऱ्या कलाकारांच्या पाठीशी आम्ही उभे'; वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांचे आश्वासन
सुशांतच्या मृत्युनंतर सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या गोष्टी जर खऱ्या मानल्या तर, बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाही यामुळे आलेल्या डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केली असावी.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput), याची आत्महत्या हा सर्वांसाठी फार मोठा धक्का आहे. सुशांतच्या मृत्युनंतर सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या गोष्टी जर खऱ्या मानल्या तर, बॉलिवूडमधील घराणेशाही, कंपूशाही यामुळे आलेल्या डिप्रेशनमुळे त्याने आत्महत्या केली असावी. या घटनेनंतर इतर अनेक कलाकारांनी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. आता ऑल इंडीया वेब मीडिया असोसिएशनचे (All India Web Media Association) अध्यक्ष अनिल महाजन (Anil Mahajan) यांनी, ‘सुशांत सिंह राजपूत’सारखे अनेक नविन बॉलिवूड स्टार अजूनही मानसिक तणावाखाली असल्याचे, मत व्यक्त केले आहे. महाजन यांनी आपल्या सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली आहे.
आपल्या पोस्टमध्ये अनिल महाजन म्हणतात, ‘अनेक नव-नवीन कलाकार आपले करियर घडवण्यासाठी, मुंबईच्या फिल्म नगरीमध्ये आपले भविष्य आजमावत आहेत. संपूर्ण जगामध्ये मुंबई बॉलिवूड इंडस्ट्रीज ही मोठी नावाजलेली आहे. अशातच पूर्ण जगभरातून लोक येथे येत असतात. यात स्वतःचा जास्तीस जास्त फायदा कसा होईल, हे पाहत काही प्रोडक्शन कंपन्या/प्रोड्युसर/डायरेक्टर आपला दबाव टाकताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात येथे दादागिरी सुरू आहे. पण आम्ही ती खपवून घेणार नाही. अनेक मोठ्या प्रोडक्शन कंपन्या/प्रोड्युसर/डायरेक्टर हे लहान प्रोडक्शन कंपनी/प्रोड्युसर/डायरेक्टर अशा अनेकांवर दबाव टाकत आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम करू देत नाही. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आम्ही मोहीम राबवत आहोत. बॉलिवूड मध्ये अन्याय होणाऱ्या लोकांना आम्ही मदत करणार. ज्या ज्या कलाकारांवर अन्याय होत असेल, अशा कलाकार लोकांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत. कोणीही कोणाला घाबरू नये, मी आपल्या पाठीशी आहे.’
पुढे महाजन म्हणतात, ‘ही मुंबई काही कोणाच्या बापाची नाही व कुठल्याही मोठ्या कलाकाराने असे समजू नये. हे कायद्याचे राज्य आहे.’ याचबरोबर त्यांनी आपला नंबर शेअर केला आहे, जेणेकरून कोणत्याही मोठ्या प्रोडक्शन कंपनीने/प्रोड्युसर/डायरेक्टरने किंवा मोठ्या कलाकाराने कोणावर अन्याय केल्यास, ती व्यक्ती मदतीसाठी महाजन यांच्याशी संपर्क साधू शकते. (हेही वाचा: संतापजनक! सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर बनवले भोजपुरी गीत; ‘या’ अभिनेत्रीने व्यक्त केला राग- ‘लाज विकली आहे की काय?’)
पुढे ते म्हणतात, ‘बॉलिवूडमध्ये कोणचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. चुकीचे काम करण्याऱ्या प्रोडक्शन कंपन्या/प्रोड्युसर/डायरेक्टरवर व बॉलिवूड क्षेत्रात काम करणारे सर्व मोठ्या एजन्सी यांना कायदेशीर योग्य तो धडा आम्ही शिकवल्याशिवाय राहणार नाही. कलाकार, छोटे प्रोडक्शन हाऊस चालक, करियर घडवण्यासाठी आलेले अनेक तरुण-तरुणी यांच्यावर कोणी दबाव टाकत असेल, कोणी धमकी देत असेल किंवा आर्थिक नुकसान करत असेल. यामुळे आपण जर मानसिक दबावाखाली आले असाल तर चिंता करू नका, चुकीचे पाऊले उचलू नका व आम्हाला संपर्क करा.’
अनिल महाजन संपर्क –
मोबाईल नंबर- ९९६७७१७१७१/ ८७८८९६४०५०*
ईमेल आयडी- info.garjamaharashtra@gmail.com
webm.association@gmail.com
अशाप्रकारे अनिल महाजन यांनी इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अनेकांना दिलासा देत आपण त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे.