Father's Day 2024: Varun Dhawan ने फादर्स डे साजरा करत मुलीची पहिली झलक केली शेअर!

नुकताच बाबा झालेला वरुण आज पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करतोय.

Photo Credit: X

अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) फादर्स डे (Father's Day) निमित्त आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर करत वडील झाल्याचा आनंद व्यक्त केला. नुकताच बाबा झालेला वरुण आज पहिल्यांदाच फादर्स डे साजरा करतोय.वरुण आणि त्याची पत्नी नताशा दलाल यांनी 3 जून रोजी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले.अभिनेत्याने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्यामध्ये त्याने आपल्या मुलीने त्याच बोट धरलेले दाखवले आहेत तर दुसऱ्याने त्याला त्याचे पाळीव प्राणी, झो चा पंजा धरलेला दाखवला होता. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या वडिलांनी मला शिकवले की हा दिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिथे जाऊन तुमच्या कुटुंबासाठी काम करणे, म्हणून मी तेच करेन. या जगात मुलीचा बाबा होण्यापेक्षा जास्त आनंद नाही”, अशी सुंदर कॅप्शन वरुणने या फोटोंना दिली आहे.

दरम्यान, वरुण आणि नताशा यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या कपलने फेब्रुवारीमध्ये एक खास फोटो शेअर करत नताशाच्या प्रग्नेन्सीची गुड न्यूज चाहत्यांना दिली.वरुणच्या या फोटोवर चाहत्यांने ही प्रतिक्रिया दिली आहे, एक चंहत्याने कमेन्ट केली आहे तू आदीच एक पाळीव कुत्र्या चा उत्कृष्ट बाबा होतास,आता एक मुलीचा देखील उत्कृष्ट बाबा होशील.तर दुसऱ्या चाहत्याने लिहले बाबा व मुलीची जोडी खूप सुंदर दिसते.

 

वरुणच्या या फोटोवर चाहत्यांबरोबरच कलाकारांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. परिणीतीने कमेंट करत लिहिलं, “मुलीचा बाबा, वरुण मोठा झालास रे तू”, मनीष पॉलने “बेस्ट बेस्ट बेस्ट!!! मुली हे वरदान असतात” अशी कमेंट केली. तर जान्हवी कपूरने हार्टचे इमोजी शेअर करत कमेंट केली.

वरूण पुढे 'बेबी जॉन' मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन 'जवान' दिग्दर्शक ॲटली करणार आहेत. 'बेबी जॉन' हा एक ॲक्शन एंटरटेनर आहे ज्याचे दिग्दर्शन ए कालीश्वरन यांनी केले आहे.वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी व्यतिरिक्त, चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि राजपाल यादव सहाय्यक भूमिकेत आहेत. 'बेबी जॉन'ला एस थमन यांनी संगीत दिले आहे