Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; इंस्टाग्रामवरून हटवले फवाद खानसोबतच्या आगामी चित्रपटाचे पोस्ट
वाणी कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'रेड 2' शी संबंधित पोस्ट दिसत आहेत, परंतु अबीर गुलालशी संबंधित पोस्ट दिसत नाहीत. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अबीर गुलालशी संबंधित सर्व पोस्ट गायब आहेत.
Vaani Kapoor Removes All Posts on Abir Gulaal: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीयांमध्ये प्रचंड संताप आहे. हल्ल्यानंतर भारत सरकारने अनेक कडक पावले उचलली. पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंदझाले. एवढेच नाही तर आता अनेक पाकिस्तानी कलाकारांचे अकाउंट सोशल मीडियावर ब्लॉक करण्यात आले आहेत. याशिवाय, पाकिस्तानी युट्यूब चॅनेल देखील युट्यूबवर ब्लॉक करण्यात आले आहेत. दरम्यान, वाणी कपूरनेही एक कठोर पाऊल उचलले आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर, प्रथम भारतात आणि नंतर पाकिस्तानमध्ये वाणी कपूर आणि फवाद खानच्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. चित्रपटातील गाणी आणि सर्व प्रमोशनल कंटेंट देखील YouTube वरून काढून टाकण्यात आला. यामुळे फवाद खानचा बॉलिवूडमध्ये परतण्याचा मार्गही बंद झाला. फवाद खान आणि वाणी कपूर स्टारर 'अबीर गुलाल' हा चित्रपट 9 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. आता वाणी कपूरने फवाद खानसोबतच्या तिच्या आगामी 'अबीर गुलाल' या चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या आहेत.
वाणी कपूरने अबीर गुलालशी संबंधित पोस्ट हटवल्या -
वाणी कपूरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'रेड 2' शी संबंधित पोस्ट दिसत आहेत, परंतु अबीर गुलालशी संबंधित पोस्ट दिसत नाहीत. अभिनेत्रीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अबीर गुलालशी संबंधित सर्व पोस्ट गायब आहेत. अभिनेत्रीने या पोस्ट डिलीट केल्या आहेत किंवा संग्रहित केल्या आहेत याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, परंतु, चित्रपटाशी संबंधित कोणतीही पोस्ट आता वाणी कपूरच्या सोशल मीडियावर दिसत नाही.
भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या अकाउंट्सवर बंदी -
दरम्यान, भारत सरकारने सर्व पाकिस्तानी कलाकारांचे अकाऊंट ब्लॉक केले आहेत. फवाद खानसह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे अकाउंटही भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. हानिया आमिर, अली जफर, आयजा खान, सजल अली, सनम सईद, इक्रा अझीझ, मावरा होकाने, आतिफ अस्लम, सबा कमर, युमना झैदी, महविश हयात आणि राहत फतेह अली खान यांच्यासह अनेक कलाकारांची खाती आता भारतात दिसत नाहीत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)