The Girl On The Train Trailer: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ

या चित्रपटात परिणीतीशिवाय आदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी आणि अविनाश तिवारी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या वर्षी मे मध्ये 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपट रिलीज होणार होता. परंतु, कोरोना पॅनेडेमिकमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले.

The Girl On The Train Trailer: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; पहा व्हिडिओ
The Girl On The Train Trailer (PC - Twitter)

The Girl On The Train Trailer: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) च्या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. द गर्ल ऑन द ट्रेन हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन'मध्ये परिणीती हत्येच्या संशयिताची भूमिका साकारत आहे. 'द गर्ल ऑन द ट्रेन'ची कहाणी मीरा या मुलीच्या भोवती फिरत आहे. ती रोज ट्रेनमधून प्रवास करताना एका कुटुंबाला सुखी आयुष्य जगताना पाहत असते. या चित्रपटात परिणीतीशिवाय आदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी आणि अविनाश तिवारी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या वर्षी मे मध्ये 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपट रिलीज होणार होता. परंतु, कोरोना पॅनेडेमिकमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. द गर्ल ऑन द ट्रेन हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट असून तो हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. ज्यात एमिली ब्लंट मुख्य भूमिकेत आहे. 2015 ला रिलीज झालेला हा हॉलिवूड चित्रपट पॉला हॉकिन्सच्या कादंबरीचे रुपांतर आहे. (वाचा - Akshay Kumar On Farmers Protest: शेतकरी आंदोलनासंदर्भात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ने सोशल मीडियावर केलं सरकारच्या बाजूचं समर्थन)

चित्रपटाचे दिग्दर्शक रिभू यांनी नेटफ्लिक्सवर ‘बार्ड ऑफ़ ब्लड' या सिरिजचे दिग्दर्शन केले असून यात इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख खानने या मालिकेची निर्मिती केली होती. कोरोना व्हायरस महामारीमुळे 2020 मध्ये थिएटर बंद पडल्यामुळे बर्‍याच मोठ्या आणि लोकप्रिय चित्रपटांनी ओटीटी रिलीजचा मार्ग निवडला. हे चित्रपट प्रामुख्याने अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लस हॉटस्टार अशा प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले.

परिणीती चोप्राचा हा चित्रपट हॉलिवूडचा सिक्वल आहे. परिणीती अखेर 2019 मध्ये दोनदा स्क्रीनवर दिसली होती. अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटात तिची खास भूमिका होती. तर जबरीया जोडीमध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. परिणीती द गर्ल ऑन द ट्रेन सह ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करीत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 03, 2021 05:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).