Tiger Shroff च्या डोळ्याला दुखापत, गणपत सिनेमासाठी स्टंट करतांना झाला अपघात
गणपत चित्रपटाचं शूटिंग दरम्यान टायगरच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिली आहे. शेयर केलेल्या फोटोमध्ये टायगरचा डोळ्याला दुखापत झाल्याच दिसत आहे. फोटो शेअर करताना टायगरनं ‘गणपत फायनल काउंटडाऊन.’असे कॅपशन दिले
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याचा डान्स आणि स्टंटमुळे नेहमीच चर्चेत असतो.त्याच्या डान्स आणि स्टंटचे अनेक चाहते आहे. तो आज बॉलिवूडमधील टॉप अॅक्शन स्टार्सपैकी एक आहे. त्याच्या प्रत्येक सिनेमात दमदार अॅक्शनने प्रत्येक वेळी त्याच्या चाहत्यांना चकित करतो. स्टंट आणि अॅक्शन मुळे टायगर ओळखला जातो. त्याने त्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. आणि तो इतर कलाकारांना प्रशिक्षणही देतो. टायगर सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो.तो त्याच्या चाहत्यांसाठी अनेकदा डान्स व्हिडिओ शेयर करत असतो.
टायगर सध्या युके मध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त आहे.तो सध्या ‘गणपत’चित्रपटाचे शुटींग करत आहे. टायगर त्याच्या प्रत्येक सिनेमा साठी प्रचंड मेहनत घेतो. त्याच्या आगामी चित्रपटासाठी देखील तो मेहनत घेत आहे.टायगर चा बराच मोठा चाहता वर्ग आहे.
गणपत चित्रपटाचं शूटिंग दरम्यान टायगरच्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती त्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दिली आहे. शेयर केलेल्या फोटोमध्ये टायगरचा डोळ्याला दुखापत झाल्याच दिसत आहे. फोटो शेअर करताना टायगरनं ‘गणपत फायनल काउंटडाऊन.’असे कॅपशन दिले.म्हणजे गणपतचं शुटींग पूर्ण होत आले आहे असे कळते. त्यामुळे गणपत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की आहे.'गणपत: पार्ट १' सिनेमा पुढच्या वर्षी २३ डिसेंबरला ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.
विकास बहल यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.'गणपत' सिनेमात टायगरसोबत त्याच्या पहिल्या चित्रपटातील अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसणार आहे.या जोडीला पुन्हा एकदा मोठ्या परद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक दरम्यान आहे. दरम्यान टायगर ला झालेली दुखापत गंभीर आहे का ? असं त्यांचे चाहते विचारत आहे. दुखापत झाल्यामुळे तो ब्रेक घेईल की शुटींग चालू ठेवेल. याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2021 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

