The Fakir Of Venice Trailer : लोकांना मूर्ख बनवून पैसा कमण्यासाठी व्हेनिसला गेलेल्या कलाकारांची भन्नाट कहाणी

जवळजवळ 10 वर्ष रखडून राहिलेला 'द फकीर ऑफ व्हेनिस' (The Fakir Of Venice) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

द फकीर ऑफ व्हेनिस (फोटो सौजन्य- ट्विटर)

बॉलिवूडमध्ये सध्या नवं नवीन विषयांच्या कथा घेऊन चित्रपट प्रदर्शित केले जातात. तसेच अशा पद्धतीचे चित्रपट बनविण्यासाठी कालावधी किती असावा हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. त्यात जवळजवळ 10 वर्ष रखडून राहिलेला 'द फकीर ऑफ व्हेनिस' (The Fakir Of Venice) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि अन्नु कपूर (Annu Kapoor) यांची भन्नाट जोडी प्रेक्षकांना पाहायल मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांवर हास्याचा वर्षाव करणारी ठरणार आहे. तर येत्या 18 जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.

'द फकीर ऑफ व्हेनिस' या चित्रपटाची कथा मानवी व्यवहारासाठी व्यक्ती कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो हे दाखविण्यात आले आहे. तसेच दोन भारतीय नागरिक लोकांना मूर्ख बनवून पैसा कमवण्यासाठी व्हेनिसला जातात. तर पैसा कमविण्यासाठी गरीब आणि साधूच्या वेशातला मार्ग शोधून काढतात. या चित्रपटात फरहान एका गरीब व्यक्तीची भुमिका साकारताना दिसून येणार आहे. तर अन्नु कपूर एका साधुची भुमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद सुरापूर यांनी केले आहे. तसेच एका मुलाखती दरम्यान आनंद सुरापूर यांनी कथेतील काही गोष्टींमुळे हा चित्रपट बनविण्यास एवढा कालावधी लागल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना हा चित्रपट आवडणार का हे पाहण्याजोगे असणार आहे.