Tandav Web Series in HD Leaked on TamilRockers & Telegram: सैफ अली खान आणि सुनील ग्रोवर स्टारर 'तांडव' वेबसिरीजचे सर्व एपिसोड्स लीक

सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया आणि गौहर खान यांची नवी वेब सिरीज तांडव सध्या प्रचंड चर्चेत आहे. राजकीय नाटकांवर आधारित या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांना भावला असून त्यामुळे सिरीजबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Tandav Web Series Leaked (Photo Credits: Twitter)

सैफ अली खान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), सुनील ग्रोव्हर (Sunil Grover), तिग्मांशू धुलिया (Tigmanshu Dhulia) आणि गौहर खान (Gauhar Khan) यांची नवी वेब सिरीज तांडव (Tandav) सध्या प्रचंड चर्चेत आहे. राजकीय नाटकांवर आधारित या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांना भावला असून त्यामुळे सिरीजबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. विशेष म्हणजे या सिरीजमधून प्रसिद्ध दिग्दर्शक अली अब्बास जफर आपला ओटीटी (OTT) डेब्यू करणार आहेत. टायगर जिंदा है, गुंडे आणि भारत यांसारख्या सिनेमांचे दिग्दर्शन केल्यानंतर अली अब्बास आता वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत.

अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ वर ही सिरीज रिलीज झाली आहे. परंतु, ही सिरीज देखील पायरसीच्या कचाट्यात सापडली आहे. ही सिरीज अॅमेझॉन प्राईम मेंबर्स OTT प्लॅटफॉर्म वर पाहू शकतात. परंतु, ज्यांच्याकडे प्राईम मेंबरशीप नाही ते या सिरीजचे पायरेटेड व्हर्जन शोधत आहेत. यासाठी टॉरेन्ट सारख्या साईटचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, तमिळरॉकर्स आणि टेलीग्राम वर तांडवचे पायरेटेड व्हर्जन डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. यासाठी युजर्स Tandav On Telegram, Tandav download, Tandav download in 720p HD TamiRockers in Tamil, Tandav 2021 Movie in 1080 HD यांसारख्या कीवर्ड्सचा वापर करत आहेत. (Tandav Trailer: सैफ अली खान, डिंपल कपाड़िया OTT प्लॅटफॉर्मवर 'तांडव' करायला सज्ज, पाहा दमदार ट्रेलर)

पायरसी हे मनोरंजन विश्वाला लागलेले ग्रहण आहे. यामुळे कलाकारांसह इतर मंडळींच्या कष्टावर पाणी फिरते. परंतु, अद्याप या विरोधात कायदा अस्तित्वात आलेला नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now