व्हिडिओ : विमानतळावर सनी लिओनीचा धमाकेदार भांगडा
सनीचा हॉट लूक. (Photo Credits : Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या सिनेमांपेक्षा इतर गोष्टींमध्ये अधिक चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावर देखील चांगलीच अॅक्टीव्ह आहे. तिचे फोटोज, व्हिडिओज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात. असाच एक धमाकेदार व्हिडिओ सनीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओची खासियत म्हणजे तो मुंबई विमानतळावरचा आहे. मुंबई विमानतळाच्या जेट ब्रिजवर सनीने आपल्या टीमसोबत एक धमाकेदार डान्स केला. सनीचा हा पंजाबी तडका लक्षवेधी ठरत आहे. सनीचा हा व्हिडिओ आतापर्यंत २० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

Yes we are silly!! @sunnyrajani @pearlmediaco @yusuf_911 @jeetihairtstylist Cameron and @tomasmoucka

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी सध्या 'करनजीत कौर' या वेबसिरीजच्या दुसऱ्या सीझनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या १८ सप्टेंबरपासून ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सनीचा बोल्डनेस आणि तिचा भूतकाळ कायमच चर्चेत राहीला. मात्र भूतकाळ दूर सारत तिने बॉलिवूड अभिनेत्री म्हणून चांगलीच ओळख निर्माण केली. तिचे वादग्रस्त आयुष्य या वेबसिरीजमधून दाखवला जात आहे. ही वेबसिरीज Zee5 वर प्रसारीत केली जाणार आहे.