Sandeep Aur Pinky Faraar Trailer 2: अर्जुन कपूर आणि परिणिती चोपड़ा यांचा सस्पेंन्स आणि थ्रिलर ने भरलेला 'संदीप और पिंकी फरार' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, Watch Video

हा ट्रेलर अॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. या चित्रपटात संदीपची भूमिका साकारात असलेला अर्जुन कपूरचा हिंसक अंदाज दाखवला आहे

Sandeep Aur Pinky Faraar Trailer (Photo Credits: YouTube)

यशराज फिल्म्स प्रस्तुत अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि परिणिती चोपड़ा (Pariniti Chopra) यांचा 'संदीप और पिंकी फरार' (Sandeep Aur Pinky Faraar) या चित्रपटाचा ट्रेलर 2 नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर अॅक्शन, सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला आहे. या चित्रपटात संदीपची भूमिका साकारात असलेला अर्जुन कपूरचा हिंसक अंदाज दाखवला आहे. जर तुम्ही ट्रेलर पाहिलात तर तुम्हाला कळेल की अर्जुन आणि परिणिती हे दोघे फरार असून सर्वजण जण त्यांचा शोध घेत आहे. यात हे दोघे भारताची सीमा ओलांडल्याचा प्रयत्न करत आहे. हा चित्रपट सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.

ट्रेलरची सुरुवात पाहिली तर पिंकीच्या मागे पोलिस लागल्याचे तुम्हाला दिसेल. यामुळे ती संदीपची मदत मागते जो तिला पळून जाण्यासाठी मदत करतो. हे दोघे एका वृद्ध माणसाच्या घरी लपतात. मात्र पोलिसांना या जागेची माहिती मिळते आणि इथेच संपूर्ण कथा बदलून जाते.हेदेखील वाचा- अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा पैकी कोण आहे 'Best Kisser', सांगतेय परिणिती चोपड़ा

पाहा धमाकेदार ट्रेलर

सुरुवातीला संदीप आणि पिंकी एकमेकांसोबत दाखवलेले असून ट्रेलरच्या शेवटी हे एकमेकांच्या विरोधात दाखवलेले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर रोमांचक, गूढ आणि अॅक्शन सीन्सने भरलेला आहे.

संदीप और पिंकी फरार या चित्रपटाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी आहेत. यांनी याआधी डिटेक्टिव ब्योमकेश बख्शीचे दिग्दर्शन केले होते. 'संदीप और पिंकी फरार' हा चित्रपट येत्या 19 मार्चला प्रदर्शित होणार आहे. ज्यानंतर परिणिती चोपड़ा हिचा 'सायना' चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका परिणिती चोपड़ा साकारणार आहे.