Salman Khan Birthday Party: पाहा सलमान खान च्या बर्थडे पार्टी मधील Cake Cutting चा हा खास व्हिडिओ
सलमान खानचा वाढदिवस यावेळी भाऊ सोहेल खानच्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Salman Khan Birthday Video: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आज आपला 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानचा वाढदिवस यावेळी भाऊ सोहेल खानच्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान मुलांवर खूप प्रेम करणारा सलमान खान त्याच्या बहीणाच्या मुलाला म्हणजेच अर्पिताचा मुलगा अहिल याला मांडीवर घेऊन केक कापतो. केक कापताना सलमानसोबत त्याचे कुटुंबही उपस्थित होते.
सलमान खानने त्याच्या वाढदिवशी केक कापून त्याचा हा खास दिवस कुटुंब आणि मीडिया या दोघांसोबत उत्साहात साजरा केला. त्याच्या दबंग 3 चित्रपटातील सोनाक्षी सिन्हा आणि किचा सुदीप हे देखील या सेलिब्रेशन दरम्यान उपस्थित होते. केक कापल्यानंतर सलमानने सुदीपला केक भारावला.
पाहा सलमानच्या बर्थडे सेलिब्रेशन दरम्यानचा हा खास व्हिडिओ. हा व्हिडिओ त्याच्या डिझाइनरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
View this post on Instagram
Happy birthday to my most fav person in the world, @beingsalmankhan love and happiness always 😘😘😘😘
A post shared by Ashley Rebello (@ashley_rebello) on
भाऊ सोहेल खान याच्या वांद्रे अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. सलमानच्या कुटूंबियांव्यतिरिक्त संगीता बिजलानी, सोनाक्षी सिन्हा, कतरिना, यूलिया वंतूर, राजपाल यादव, साजिद नाडियाडवाला, डेझी शाह, दबंग 3 चे खलनायक किच्चा सुदीप, तब्बू, सुनील ग्रोव्हर, बॉबी देओल, पुलकित सम्राट यांच्यासह त्यांची मैत्रीण कृति खरबंदा, रवीना टंडन, हिमेश रेशमिया आणि अनेक चित्रपटातील कलाकार सहभागी झाले होते.
Salman Khan Birthday Special: सलमान खान च्या फिटनेसच 'हे' आहे रहस्य Watch Video
दरम्यान, सलमान दरवर्षी त्याचा वाढदिवस त्याच्या पनवेल येथील फार्म होऊस मध्ये साजरा करतो. परंतु, त्याने यावर्षी हा प्लॅन का बदलला हे अद्याप कळलेलं नाही.