'बागी 3' चित्रपटात रितेश देशमुख याची लागली वर्णी

या चित्रपटात टाइगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Ritesh Deshmukh in baaghi 3 (Photo Credits: Instagram)

साजिद नाडियाडवाला (Sajid Nadiadwala)  निर्मित 'बागी 3' (Baaghi 3) या चित्रपटात सध्या नवीन कलाकारांची एन्ट्री होत आहे. त्यात हाती आलेल्या बातमीनुसार, आता 'बागी 3' मध्ये अभिनेता रितेश देशमुखची (Ritesh Deshmukh) देखील वर्णी लागली आहे. या चित्रपटात टाइगर श्रॉफ (Tiger Shroff)आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अहमद खान (Ahmed Khan) यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती.

'बागी 1' आणि 'बागी 2' ला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर आता सर्वत्र चर्चा सुरु झालीय ती 'बागी 3' या चित्रपटाची. आता या चित्रपटामध्ये रितेश देशमुखची वर्णी लागलीय. सिनेमा ट्रेड समीक्षक तरन आदर्श यांनी ट्विटरवर ह्या चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये असे म्हटलय की, 'रितेश देशमुखची 'बागी 3' चित्रपटात वर्णी लागली आहे. यात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर सुद्धा आहेत. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. रितेश आणि निर्माता साजिद नाडियाडवाला एकत्रित काम केलेला 6 वा चित्रपट आहे.

'बागी' ह्या सिनेमाचे सर्व सिक्वेल हे अॅक्शन पॅक्ड सीन्सने भरलेले असतात. या चित्रपट प्रेमकथेवर आधारित आहे. ज्यात टायगर श्रॉफ दमदार अॅक्शनसुद्धा करताना दिसलाय. तर रितेश देशमुख हा मुख्यत्वे विनोदी अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या चित्रपटात तो नेमका कोणत्या अंदाजात दिसेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तसेच रितेशचे टायगर श्रॉफबरोबर काही अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

Baaghi 3 Poster : Tiger Shroff ने Instagram वर शेअर केलं बागी 3 सिनेमाचं पहिलं पोस्टर

'बागी 3' व्यतिरिक्त रितेश 'हाउसफुल 4' मध्ये दिसेल. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा सोबत 'मरजावां' चित्रपटातही तो काम करणार आहे. हा चित्रपट 5 मार्च 2020 मध्ये प्रदर्शित होईल.