Riteish Deshmukh ने एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवला आपला जीवनप्रवास, Watch Video

या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आपला छोटा मुलगा ते एक उत्कृष्ट अभिनेता पर्यंतचा प्रवास मांडला आहे.

Riteish Deshmukh Career Journey (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असतो. आपले एकाहून एक सुंदर आणि मजेशीर व्हिडिओ तसेच फोटोज शेअर करुन तो चाहत्यांना खूश करत असतो. रितेश देशमुख ऑनस्क्रिन जितकी विनोदी अभिनय करतो तसे ऑफस्क्रिनही आपले बरेच मजेशीर व्हिडिओ बनवत असतो. त्याचे आणि त्याची पत्नी जेनेलियाचे छोटे व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत असतात. मात्र नुकताच त्याने एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या आपले आणि आपल्या चित्रपटांच्या पोस्टर्सचे फोटो वापरून एक सुंदर व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने आपला छोटा मुलगा ते एक उत्कृष्ट अभिनेता पर्यंतचा प्रवास मांडला आहे.

या व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला रितेश देशमुखचा बालपणीचा फोटो पाहायला मिळेल. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याच्यात झालेला बदल तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल. यात त्या व्हिडिओच्या शेवटी त्याचा हाऊसफुल 4 मधील लूकने केला आहे.हेदेखील वाचा- रितेश देशमुख ने लग्नापूर्वी जेनेलिया ला पाठवलेल्या 'त्या' मेसेजमुळे त्यांचे नाते येणार होते संपुष्टात, कपिल शर्माच्या शो मध्ये पत्नीने सांगितला किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

याआधीही रितेशने आपले अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर रितेश आणि जेनेलियाचे टिकटॉक व्हिडिओही प्रचंड लोकप्रिय आणि तितकेच व्हायरल झाले होते. दरम्यान त्याने आपल्या वडिलांच्या कपड्यांसोबत केलेल्या व्हिडिओने तर अनेकांना भावूकही केले.

दरम्यान, रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ केदारनाथ मंदिराचा (Kedarnath Temple) असून त्यातील दृश्यं विलोभनीय आहे. "Kedarnath Temple!! Breathtakingly beautiful"  असं म्हणत रितेश देशमुख याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यासोबत #omnamahshivay हा हॅशटॅगही जोडला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओमागे वाजणारी आरती यामुळे सुरेख वातावरण निर्मिती झाली आहे. आभाळ भरुन आल्याने आकाश काळसर निळं दिसत आहे. धुकं अगदी मंदिराच्या कळसापाशी दाटलं आहे.