RHTDM 2: 'रहना है तेरे दिल में' चित्रपटाचा सिक्वेल येणार, 'ही' अभिनेत्री साकारणार दिया मिर्झाची भूमिका?

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, RHTDM 2 मध्ये दिया मिर्झाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड देखील पक्की झाली आहे.

RHTDM 2 (Photo Credits: Facebook)

प्रेमाचा एक नवा रंग, नवी परिभाषा, नवा अंदाज घेऊन 2001 साली आलेल्या 'रहना है तेरे दिल में' (Rehna Hai Tere Dil Mein) या चित्रपटाने अवघ्या तरुणाईला वेडं लावलं आहे. या चित्रपटातील मॅडी, रीना आणि सॅम ही पात्र तर प्रेक्षक अजूनही विसरली नाही. आर माधवन (R Madhavan) आणि दिया मिर्झा (Dia Mirza) यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने या दोन कलाकारांना देखील प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील पात्रांपासून या चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहे. म्हणूनच जॅकी भगनानी (Jackky Bhagnani) या RHTDM चा लवकरच सिक्वेल आणण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, RHTDM 2 मध्ये दिया मिर्झाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवड देखील पक्की झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रहना है तेरे दिल में च्या सिक्वेलमध्ये रिनाच्या भूमिकेसाठी क्रिती सेनॉनचे (Kriti Sanon) नाव निश्चित करण्यात आले आहे. वासु भगनानी या मूळ चित्रपटाचे निर्माते होते. त्यामुळे त्यांचा मुलगा जॅकी भगनानी या चित्रपटाचा सिक्वेल बनविण्याच्या तयारीत आहे.हेदेखील वाचा- Dia Mirza-Vaibhav Rekhi Wedding: दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली अभिनेत्री दिया मिर्झा; बॉयफ्रेंड 'वैभव रेखी'सोबत बांधली गाठ, पहा नव्या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

दिया मिर्झाच्या जागी क्रिती सेनॉन हिच्या नावाची चर्चा असली तरी आर माधवन आणि सैफ अली खानच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्यांची निवड होणार हे अजून निश्चित झाले नाही.

आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांनाच सिनेमाच्या सिक्वेलमध्ये घेण्याची जॅकीची इच्छा होती. वीस वर्षांनंतरची कथा दाखवण्याचा त्याचा प्लॅन होता. जॅकी लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच जवळपास गेल्या वर्षभरापासून या प्रोजेक्टवर काम करत आहे. मात्र तिघांना पुन्हा एकत्र आणण्याचा त्याचा प्लॅन यशस्वी होत नव्हता. त्यामुळे जॅकीने नव्या कलाकारांसोबत रहना है तेरे दिल में चा सिक्वेल बनविण्याचा चंग बांधला आहे.

आर माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान जरी या चित्रपटात नसले तरीही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांना विचारले जाऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.