Pushpa 2 Trailer: '...फायर नही वाईल्ड फायर है’ जबरदस्त डायलॉगसोबत अल्लू अर्जुनचा खतरनाक स्वॅग; ‘पुष्पा 2’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ही हत्तीच्या आवाजान सुरु होते. या चित्रपटात देखील लाल चंदनाची तस्करी आणि त्यातून येणाऱ्या पैसे सोबतच यासभोवताल फिरणारे राजकारण हे दाखवण्यात आले

Photo Credits - Youtube

Pushpa 2 Trailer:   अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमाने 2021 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटातील अभिनयाला पाहून सर्वांनेच त्याचे कौतृक केले होते.  या चित्रपटातील डायलॉग्स, गाणी, स्टाईलमुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता या सिनेमाचा दुसरा भाग येणार असून त्याचा ट्रेलर आला आहे. ‘पुष्पा २ द रुल’ (Pushpa 2 Rule) हा तीन वर्षानंतर सिनेमाचा दुसरा भाग येणार असून हा बहुचर्चित ट्रेलर पटनामध्ये मोठ्या सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला आहे. पुष्पा फायर नही वाईल्ड फायर है’ "अपून को नॅशनल खिलाडी समजा क्या? इंटरनॅशनल है आपून" अशा अनेक डॉयलागने भरलेला हा ट्रेलर चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे.  (पाहा पोस्ट -  Pushpa 2: अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' चा ट्रेलर 17 नोव्हेंबरला होणार रिलीज, चित्रपटात ॲक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेता (पोस्टर पहा) )

पाहा ट्रेलर - 

‘पुष्पा 2 द रुल’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात ही हत्तीच्या आवाजान सुरु होते. या चित्रपटात देखील लाल चंदनाची तस्करी आणि त्यातून येणाऱ्या पैसे सोबतच यासभोवताल फिरणारे राजकारण हे दाखवण्यात आले आहे. पहिल्या भागा पेक्षा दुसऱ्या भाग हा ग्रॅण्ड असल्याचे या ट्रेलर वरून दिसते. या चित्रपटात हेलिकॉप्टर मधून तर कधी मागे मोठ्या गाड्या पुढे पुष्पा अशी अल्लू अर्जुनची एंट्री दाखवली गेली आहे. सोबतच या चित्रपटाची स्टोरीलाईन ही देशासोबत परदेशात देखील वावरतो.

‘पुष्पा का उसुल करनेका वसूल’  अशा अनेक डॉयलॉगची या चित्रपटात भरणा आहे. सोबतच जबरदस्त अक्शॅन सिन्स या चित्रपटात दिसून येते. ट्रेलरमधील सर्व डायलॉग मराठमोळ्या श्रेयस तळपतेच्या आवाजात आणखीच ट्रेलरला चारचांद लावतात. हा चित्रपटत सिनेमागृहात 5 डिसेंबर 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement