Priyanka Nick Wedding: निक जोनस, प्रियंका चोप्रा कामाईच्या बाबातीत कोण आघाडीवर?
या विवाहासाठी निक जोनसचे कुटुंबीय भारतात आले आहेत. या विवाहाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.
Priyanka Nick Wedding: बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) यांच्या लग्नाची सध्या भलतीच चर्चा रंगली आहेत. जगभरातील सेलिब्रेटींच्या विवाहाबाबत जशी उत्सुकता असते तशीच उत्सुकता या दोघांच्या विवाहाबद्दल आहे. उभय वधू वरांबाबत मजेशीर गोष्ट अशी की, वर निक जोनस हा वधू प्रियांकापेक्षा तब्बल ११ वर्षांनी लहान आहे. त्यांच्यातील केमेस्ट्रीही छान आहे. पण, वयाने लहान असला तरी, निक प्रियंकापेक्षा कमाईच्या बाबतीत मात्र खूपच पुढे आहे. जाणून घ्या किती फरक आहे दोघांच्या कमाईत?
नोव्हेंबर 2017मध्ये फोर्ब्स (Forbes) या जगप्रसिद्ध मासिकाने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिची वार्षिक कमाई 10 मिलियन म्हणजेच 64 कोटी रुपये इतकी होती. तर Daily Mail estimates ने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार निक जोनस (Nick Jonas) याची वार्षिक कमाई 25 मिलियन म्हणजेच 171 कोटी रुपये इतकी आहे. आता ही आकडेवारी पाहात आपणही ठरवू शकता की दोघांमध्ये कमाईच्या बाबतीत आघाडीवर कोण आहे. तसेच, दोघांच्या कमाईत किती तफावत आहे. महत्त्वाचे असे की, येथे दिलेली कमाईची रक्कम ही 1 June, 2016 ते 1 June, 2017 या कालावधीतील आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तापासून, प्रियंका चोप्रा आणि अमेरिकी पॉपस्टार निक जोनस यांची पहिली भेट 'क्वांटिको'च्या सेटवर झाली. 'क्वांटिको'च्या सेटवरही दोघे एकमेकांना तसे ओळखत नव्हते. पण, एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली. त्यानंतर या भेटीची ओळख मैत्री, प्रेमात आणि आता थेट विवाहात परावर्तीत झाली. दरम्यान, गेल्याच वर्षी १ मे रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या 'मेट गाला' फंक्शनमध्ये प्रियंका आणि निक सोबतच पोहोचले होते. त्यानंतर एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ग्राहम रोजरच्या माध्यमातून प्रियंका आणि आपली ओळख झाली. (हेही वाचा, शाही विवाहसोहळ्यासाठी प्रियंका-निक जोधपूरमध्ये दाखल )
प्रियंका चोप्रा आणि निक जोनस येत्या २ आणि ३ डिसेंबर रोजी जोधपुर येथे हिंदू आणि ख्रिश्चन रीती-रिवाजानुसार विवाहबद्ध होणार आहेत.