Priyanka Chopra ने न्यूयॉर्क मध्ये सुरु केलेले भारतीय रेस्टॉरन्ट 'Sona' आतून दिसते इतके आलिशान, तुम्ही पाहिले का हे Inside Photos?
चित्रपटाची निर्माती बनल्यानंतर प्रियंकाने हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक केली आहे. प्रियंकाच्या या नव्या रेस्टॉरन्टचे फोटोज पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) कधी विदेशी गर्ल आणि विदेशी सून झाली काही कळेलच नाही. कारण बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंतचा तिचा प्रवास खूपच वाखाणण्याजोगा आहे. त्यात एक उत्तम लेखिका, निर्माती, गायिका म्हणूनही तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यात आता न्यूयॉर्कमधील (New York) एक भारतीय रेस्टॉरन्टची मालकीण ही नवी ओळख तिने बनवली आहे. प्रियंकाने न्यूयॉर्कमध्ये स्वत:चे भारतीय रेस्टॉरन्ट (Indian Restaurant in New York) सुरु केले आहे. 'Sona' असे या रेस्टॉरन्टचे नाव आहे. या रेस्टॉरन्ट सुरु झाल्यानंतर स्वत: प्रियंकाने आपल्या सोशल अकाउंटद्वारे या रेस्टॉरन्टचे आतील फोटोज शेअर केले आहे.
प्रियंकाचे 'सोना' रेस्टॉरन्ट आतूनही तितकेच आलिशान आहे. चित्रपटाची निर्माती बनल्यानंतर प्रियंकाने हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक केली आहे. प्रियंकाच्या या नव्या रेस्टॉरन्टचे फोटोज पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.हेदेखील वाचा- Priyanka Chopra ने न्यूयॉर्कमध्ये उघडलं भारतीय रेस्टॉरंट; अभिनेत्रीने दिलं 'हे' नाव, जाणून घ्या कधीपासून सुरू होणार
हे रेस्टॉरन्ट आणि त्याचे इंटिरियलही खूप आलिशान आहे. सोशल मिडियावर याचे फोटोज शेअर करुन न्यूयॉर्क आणि त्याच्या जवळच्या भागात या रेस्टॉरन्टचे अनेक ब्रांचेस ती सुरु करणार आहे.
तिने या रेस्टॉरन्टचे फोटोज शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर आपण तिच्या रेस्टॉरन्टला भेट देण्यास उत्सुक आहोत अशाही प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. तर अभिनेत्री मिनी माथुर, "जगात अशी कोणती गोष्ट आहे जी तू करु शकत नाही" अशी कौतुकास्पद कमेंट दिली आहे.
रेस्टॉरंट्स व्यतिरिक्त ती आपल्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकासाठीही चर्चेत आहे. या पुस्तकात प्रियंका चोप्राने तिच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा शेअर केल्या आहेत.