Priyanka Chopra ने पति निक जोनस ला दिले खास सरप्राईज, सोशल मिडियावर व्हायरल झाला व्हिडिओ
निक जोनसने आपल्या प्रिय पत्नीने प्रियंकाने आपल्यासाठी खास सरप्राईज दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) सध्या आपल्या पती निक जोनस (Nick Jonas) सोबत राहून विदेशी गर्ल झाली आहे. तिचे आणि निक जोनस चे अनेक व्हिडिओज आणि फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. या कपलचे सोशल मिडियावर असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय चाललयं हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. त्यात आता निक जोनसने आपल्या प्रिय पत्नीने प्रियंकाने आपल्यासाठी खास सरप्राईज दिल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
निक जोनसने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. निक ने हा व्हिडिओ शेअर करुन प्रियंकाला धन्यवाद दिले आहेत. "माझ्या पत्नीने आज मला (All the Way From London) सरप्राइज दिले आहे. थँक्यू प्रियंका" असे कॅप्शन देत त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये निक एका अंधा-या खोलीत जात आहे. जेथे त्याने आत गेल्यावर पाहिले की, तिथे फुगे लावलेले होते आणि डेकोरेशनच्या काही वस्तूंनी सजवले होते. दोन फुग्यांवर लिहिले होते, 'सॅटरडे नाइट लाइव' आणि 'मुबारक निक'. हे पाहिल्यानंतर निक हसत म्हणाला, "हे खूपच चांगले आहे. धन्यवाद बेब." निकचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
निक जोनस येत्या 27 फेब्रुवारीला 'सॅटरडे नाइट लाइव शो' मध्ये गेस्ट म्हणून नाही तर शो चे सुत्रसंचालन करताना दिसणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 21, 2021 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

