Nora Fatehi Performance At FIFA: अभिनेत्री नोरा फतेही लगवणार फुटबॉल फिफा वर्ल्डकपमध्ये ठुमके, फिफामध्ये परफॉर्म करणारी नोरा पहिली भारतीय अभिनेत्री

डान्सर जेनिफर लोपेझआणि शकीरा या आंतराष्ट्रीय स्टार्स नंतर नोरा फतेही ही पहिली भारतीय अभिनेत्री असणार आहे जी फिफा वर्ल्डकपमध्ये परफॉर्म करणार आहे.

Sexy Figure and Fitness Secrets of bollywood actress Nora Fatehi | (Photo credit: archived, edited, representative image)

अभिनेत्री नोरा फतेहीचा (Nora Fatehi) डान्स जगातभारी असल्याची पुन्हा एकदा खात्री पटली आहे. कारण फुटबॉल वर्ल्डकप 2022 (Football World Cup 2022) मध्ये अभिनेत्री नोरा फतेही ठुमके लगवणार आहे. डान्सर जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) आणि शकीरा या आंतराष्ट्रीय स्टार्स नंतर नोरा फतेही ही पहिली भारतीय अभिनेत्री असणार आहे जी फिफा वर्ल्डकपमध्ये परफॉर्म करणार आहे. नोरा फतेहीने अधिकृत कतार विश्वचषक गीतामध्ये दिसुन आली. तीन दिवसापूर्वीचं म्हणजे  7 ऑक्टोबर रोजी हे गाणं फिफाच्या अधिकृत यूट्यब (YouTube) पेजवर रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणे रेडओनने प्रोड्यबस केले आहे. लाइट द स्काय (Light The Sky) असे या गाण्याचं नाव असुन या गाण्यात बल्कीस, मनाल, रहमा रियाद सोबत नोरा फतेही दिसून येत आहे.नोरा फतेही डिसेंबर 2022 मध्ये फिफा वर्ल्ड कपच्या समारोप समारंभात दिसुन येणार आहे.

 

यापूर्वी नोरा विविध भारतीय अल्बम गाणे (Album Songs), बॉलिवूड सिनेमा (Bollywood Movie) किंवा अवॉर्ड समारंभात (Award Function) ठुमके लगवताना दिसली आहे. पण जागतिक स्तरावरील क्रिडा स्पर्धेत नोरा फतेही (Nora Fatehi) पहिल्यांदाचं ठुमके लगवताना दिसणार आहे. तरी नोराच्या भारतीय फॅन्सला (Nora Fatehi Fans) तिच्या या परफॉर्मन्सची (Performance) मोठी उत्सुकता आहे. (हे ही वाचा:- Alia Bhatt Baby Shower: दसऱ्याच्या मुहूर्तावर पार पडले आलिया भट्टचे डोहाळेजेवण; कुटुंबासोबत जवळच्या मित्रांनी लावली हजेरी (Watch Photo and Videos)

 

नोराचा बेली डान्स (Nora Fatehi Belly Dance) असो वा हिपहॉपची चर्चा आता फक्त भारतातचं नाही तर सात समुद्रा पलिकडेही होत आहे.  नोरो तिच्या डान्ससह तिच्या सोशल मिडीया (Social Media Post) पोस्टबाबत कायमचं चर्चेत असते. तिच्या या आंतरराष्ट्रीय परफॉमन्सची (International Performance) चर्चा भारताप्रमाणेचं भारताबाहेरही होत आहे. कारण नोरा फतेहीचे फक्त भारतातचं नाही तर भारताबाहेरही फॅन्स आहेत.