Model Poonam Pandey Arrested: पूनम पांडे हिस गोवा पालिसांकडून अटक, कथीत अश्लिल व्हिडिओ चित्रिकरण भोवले

चापोली डॅम येथे 'अश्लिल व्हिडिओ' चित्रित केल्याचा आरोप पूनम पांडे हिच्यावर करण्यात आला होता. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली होती.

Poonam Pandey | (Photo Credits: Facebook)

आपल्या कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेली आणि वादात सापडणारी मॉडेल पूनम पांडे (Model Poonam Pandey) हिला गोवा पोलिसांनी अटक (Model Poonam Pandey Arrested) केली आहे. गोवा पोलिसांनी (Goa Police) पूनम पांडे (Poonam Pandey) हिला आगोदर ताब्यात घेतले. त्यानंतर तिला अटक केली. तिच्यावर गोव्यातील एका समुद्रकिनारी आक्षेपार्ग चित्रिकरण (Poonam Pandey Video in Goa) केल्याचा आरोप आहे. तेव्हापासून ती चर्चेत होती. तसेच तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली जात होती. पूनम पांडे हिने केलेल्या कथीत अश्लील चित्रिकरणावर आक्षेप घेतल्यानंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात होती. अखेर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टी महिला शाखेने पूनम पांडे हिच्याविरोधात तक्रार दिली होती. चापोली डॅम येथे 'अश्लिल व्हिडिओ' चित्रित केल्याचा आरोप पूनम पांडे हिच्यावर करण्यात आला होता. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात प्राथमिक तक्रार दाखल केली होती. तसेच,आणखी एका व्यक्तीनेही या चित्रिकरणावरुन कैनाकोना पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.

Poonam Pandey | (Photo Credits: Facebook)

पूनम पांडे चित्रिकरण प्रकरणात एका पोलिस निरिक्षकाला निलंबीत करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, पूनम पांडे हिने या वर्षाच्या सुरुवातीला एक व्हिडिओ चित्रित केला होता. यात ती एका समुद्रकिनारी भारतीय दंड संहिता कलम 294 (अश्लिलता) उल्लंघन करताना आढळल्याचा दावा करण्यात येतो आहे. (हेही वाचा, Poonam Pandey हिला अश्लील फोटोशूटची परवानगी देणारे गोवा पोलिस अधिकारी निलंबित)

Poonam Pandey | (Photo Credits: Facebook)

दरम्यान, पुनम पांडे हिचे वादग्रस्त असणे आणि वादात सापडणे नवे नाही. या आधीही पूनम पांडे अनेकदा वादात सापडली आहे. अलिकडेच तिने आपला पती सॅम बॉम्बे याच्यावर मारहाण आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. तक्रारीनंतर तिने स्वत:च एक व्हिडिओ शेअर करत आता सर्व काही ठिक असल्याचे म्हटले होते.

Poonam Pandey | (Photo Credits: Facebook)

दरम्यान, पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे या दोघांना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केले होते. पूनम पांडे ही सोशल मीडिया, इंटरनेटवर प्रचंड सक्रीय असते. आपले उत्तानावस्थेतील फोटो आणि व्हिडिओ सातत्याने शेअर करत ती आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.