Madhuri Dixit ने आपल्या पतीसह बनवले महाराष्ट्रीयन पदार्थ 'कांदेपोहे', डॉ. श्रीराम नेनें नी सांगितला आपल्या आजीचा एक किस्सा, Watch Video

नेने हिरवी मिरची खाताना दिसत आहे.

Madhuri Dixit And Dr. Shriram Nene (Photo Credits: Instagram)

एक उत्कृष्ट नृत्यांगणा, उत्तम अभिनेत्री अशी ओळख असणारी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता उत्तम गृहिणी देखील झाली आहे. आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ती वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन रेसिपीजचे व्हिडिओज शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने चक्क आपले पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांना देखील कामाला लावले आहे. नवरा-बायको दोघे मिळून महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात आवर्जून बनणारा पदार्थ 'कांदेपोहे' (Kandepohe) बनवत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओच्या सुरुवातीला डॉ. नेने हिरवी मिरची खाताना दिसत आहे.

हे कांदेपोहे बनवताना माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांना आपल्या आपल्या मामीची आणि आईची आठवण झाली. डॉ. नेने यांनी आपल्या आजीची आठवण सांगत आपल्याला ती रोज सकाळी कांदेपोहे बनवून द्यायची असे ते व्हिडिओमध्ये सांगत आहे.हेदेखील वाचा- Shah Rukh Khan व Gauri Khan यांचे दिल्लीतील लक्झरी घर Air BnB वर उपलब्ध; किंग खानच्या घरात Valentine's Day 2021 साजरी करण्याची संधी, जाणून घ्या कसे

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

तर माधुरी दिक्षित ने देखील आपल्या कांदेपोहे बद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत. हा व्हिडिओ बनवताना हे दोघे छान मजामस्ती करताना दिसत आहे. तर डॉ. नेनें सुरुवातीला हिरवी मिरची देखील खाताना दिसले आहेत.

नृत्य आणि अभिनयासोबत माधुरी आपली पाककला देखील जपत आहे. तिचे युट्यूबवरील रेसिपीजचे व्हिडिओ तिचे चाहते प्रचंड पसंत करत आहे. यात तिचे पती श्रीराम नेने देखील तिला साथ देत आहेत. लॉकडाऊन दरम्यान माधुरीने आपल्या गाण्याचा व्हिडिओ देखील प्रदर्शित केला होता. तो देखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. अलीकडे माधुरीने आपल्या पतीसह साबुदाणा खिचडीचा व्हिडिओ देखील शेअर केला होता.