चीनी प्रॉडक्ट्सवर बहिष्कार घालण्याचे कंगना रनौत हिचे आवाहन (Watch Video)
पहा काय म्हणाली कंगना...
सध्या भारत-चीन मध्ये सुरु असलेल्या तणावावर बॉलिवूडची क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने देखील भाष्य केले आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन सैन्याने भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्याबद्दल तिने द्वेष व्यक्त केला आहे. त्यामुळेच चीनी प्रॉडक्ट्सवर बहिष्कार घालून सरकार आणि सैन्यासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन कंगना रनौत हिने केले आहे. (अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर करण जौहर चे इन्स्टाचे तब्बल 10 लाख फॉलोअर्स झाले कमी तर कंगना रनौतच्या च्या फॉलोअर्समध्ये झाली 'इतकी' वाढ)
यासाठी कंगना हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, जर कोणी हातापासून तुमची बोटे वेगळी करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आपल्या हातापासून तळवा वेगळा करण्याचा प्रयत्न करत असेल किती त्रास होईल. तोच त्रास चीनने आपल्याला दिला आहे. पुढे कंगना म्हणाली, सीमेवर सैन्यांमध्ये जे युद्ध होते त्यात केवळ सेनेचे आणि सरकारचे असते. त्यात आपला काही हक्क नाही, सहभाग नाही, असे बोलणे कितपत योग्य आहे. कारण लडाख हा केवळ एक जमिनीचा तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा मोठा भाग आहे.
पहा व्हिडिओ:
View this post on Instagram
"We have to stand together, unite, and collectively fight this war against China!" #अब_चीनी_बंद
A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on
कंगना पुढे म्हणाली, आपल्या सर्वांना आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. मी त्यासाठी आग्रही आहे. सर्व चीनी वस्तूंवर, उत्पादनांवर आणि कंपन्यावर बहिष्कार घालायला हवा. भारताकडून मिळणाऱ्या रेव्ह्युन्यू तून ते आपल्या सैनिकांना मारण्यासाठी हत्यारं खरेदी करतात. म्हणून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून आत्मनिर्भर होण्याची प्रतिज्ञा करुया.