काजोल चे इंस्टाग्राम अकाऊंटवर 1 कोटी फॉलोअर्स; हटके स्टाईलमध्ये मानले चाहत्यांचे आभार (Watch Video)
या आनंदाचे सेलिब्रेशन आणि चाहत्यांना धन्यवाद देण्यासाठी काजोल कभी खुशी कभी गम सिनेमातील एक डान्स सीन शेअर केला आहे.
सोशल मीडियाच्या क्रेझ मधून कोणीही सुटलेले नाही. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही सोशल मीडियाची भूरळ पडली आहे. त्यात अलिकडे तर फॉलोअर्सच्या संख्येवरुन लोकप्रियता मोजली जाते. त्यामुळे फॉलोअर्स वाढण्यासाठी सेलिब्रिटी धडपडत असतात आणि फॉलोअर्सची इच्छित संख्या पूर्ण झाली की त्याचा आनंदही सेलिब्रेट करतात. असा सुखद क्षण बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) हिच्या आयुष्यात आला आहे. इंस्टाग्रामवर एक कोटीहून अधिक फॉलोअर्स पूर्ण झाल्याने तिने चाहत्यांचे हटके स्टाईलमध्ये आभार मानले आहेत. या आनंदाचे सेलिब्रेशन आणि चाहत्यांना धन्यवाद देण्यासाठी काजोलने 'कभी खुशी कभी गम' (Kabhi Khushi Kabhie Gham) सिनेमातील एक डान्स सीन शेअर केला आहे. (अजय देवगण-काजोल ची मुलगी न्यासा ला कोरोनाची लागण? अजयने सांगितली खरी हकिगत)
या व्हिडिओत काजोल ढोलच्या तालावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, "हा आनंद माझ्या इंस्टाग्राम फॉलोअर्ससाठी आहे. ज्यांनी माझ्या रियल आणि रिल या दोन्ही भूमिकांवर इतके प्रेम केले, तुमची काजोल."
पहा व्हिडिओ:
अजय देवगण-काजोलच्या 'तानाजी' सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. त्यानंतर 'देवी' या शॉर्ट फिल्ममधून काजोल आपल्या भेटीला आली. आता लवकरच काजोल डिजिटल प्लॅटफॉम वरुन आपली नवी सुरुवात करणार आहे. रेणुका शहाणे दिग्दर्शित नेटफ्लिक्स सिनेमा 'त्रिभंगा' सिनेमात काजोल झळकणार आहे.