Yo Yo Honey Singh Christmas Song: ख्रिसमस निमित्त हनी सिंह ने सादर केले Jingle Bell सॉन्ग; गाणे सोशल मीडियात हिट (Watch Video)

ख्रिसमस निमित्त बॉलिवूडचा रॅप सिंगर यो यो हनी सिंह यांने रसिकांसाठी एक नवे गाणे सादर केले आहे. या नव्या ख्रिसमस स्पेशल गाण्याचे बोल जिंगल बेल असे आहे. या गाण्यात हनी सिंह सोबत गायक होमी दिल्लीवाला देखील दिसून येत आहे.

Yo Yo Honey Singh Christmas Song: ख्रिसमस निमित्त हनी सिंह ने सादर केले Jingle Bell सॉन्ग; गाणे सोशल मीडियात हिट (Watch Video)
Yo Yo Honey Singh Christmas Song (Photo Credits: Instagram)

Yo Yo Honey Singh Christmas Song: ख्रिसमस निमित्त बॉलिवूडचा रॅप सिंगर यो यो हनी सिंह यांने रसिकांसाठी एक नवे गाणे सादर केले आहे. या नव्या ख्रिसमस स्पेशल गाण्याचे बोल 'जिंगल बेल' असे आहे. या गाण्यात हनी सिंह सोबत गायक होमी दिल्लीवाला (Hommie Dilliwala) देखील दिसून येत आहे. आपल्या आकर्षक रॅप स्टाईलसाठी प्रचलित असलेल्या हनी सिंह ने देखील 'जिंगल बेल' गाणे त्याच अंदाजात गायले आहे. गाण्यात हनी सिंग तरुणांसोबत पार्टी आणि एन्जॉय करताना दिसत आहे. पार्टी आणि सेलिब्रेशनच्या थीमवर सेट करण्यात आलेल्या गाण्याला 3 लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हे गाणे हनी सिंग ने आपल्या युट्युब चॅनलवर देखील शेअर केले आहे.

हे गाणे हनी आणि होमी दिल्लीवाला यांनी एकत्रितपणे मिळून बनवले आहे. सध्या हे गाणे इंटरनेटवर ट्रेंडमध्ये असून यावर रसिक आपल्या प्रतिक्रीया नोंदवत आहेत.

पहा व्हिडिओ:

या गाण्याप्रमाणे हनी सिंह नेहमीच पॉप आणि रॅप सॉन्ग्सचा वर्षाव करत असतो. रसिकांना देखील हनी सिंहचा हा अनोखा अंदाज भावतो. रसिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे हनी नवनवी गाणी सादर करत असतो. काही दिवसांपूर्वी हनीचे 'केयर नी करदा' गाणे प्रदर्शित झाले होते. सर्वाधिक ट्रेंडिग गाण्यांपैकी एक गाणे ठरले होते.

(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2020 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).