IPL Auction 2025 Live

Gudi Padwa 2020: अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने अस्सल मराठीत दिल्या गुढीपाडवा च्या शुभेच्छा; आजी, आई सोबतचा 'हा' खास फोटो केला शेअर (See Photo)

श्रद्धाने अस्सल मराठीत आपल्या फॅन्सना गुढीपाडवा च्या शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी तिने आपली आई, आजी आणि स्वतःचा फोटो शेअर करून आपल्या तीन पिढ्यांमधून जपलेली मराठमोळी संस्कृती दाखवून दिली आहे.

Shraddha Kapoor (Photo Credits: Instagram)

आज 25 मार्च रोजी गुढी पाडवा (Gudi Padwa 2020) साजरा केला जात आहे, मराठी नववर्षाची सुरुवात मानला जाणारा हा सण दरवर्षी शोभायात्रा, मेजवान्या, ढोल ताशांचे गजर आणि एकूणच उत्साहपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो, मात्र यंदा या सणावर कोरोनारूपी संकटाचे सावट असल्याने हा उत्साह काहीसा मावळला आहे.लोकांना घराबाहेरही पडणे शक्य नसल्याने यंदा शोभायात्रा सुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत, परिणामी या सणाचे घरगुती सेलिब्रेशन केले जात आहे. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यापैकी एक खास फोटो बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)  हिने शेअर केला आहे. श्रद्धाने अस्सल मराठीत आपल्या फॅन्सना गुढीपाडवा च्या शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी तिने आपली आई, आजी आणि स्वतःचा फोटो शेअर करून आपल्या तीन पिढ्यांमधून जपलेली मराठमोळी संस्कृती दाखवून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळं ट्वीट; 

श्रद्धा कपूर हिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोला मराठीतून कॅप्शन देताना, पिढ्यानपिढ्या जपलेला पेहराव...साडीपिढ्यानपिढ्या उभारलेला सन्मान...गुढी पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा...गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असे म्हंटले आहे. श्रद्धाने या कॅप्शन सोबत आई आणि आजीचा जुना फोटो तसेच स्वतःचा सुद्धा साडीतील एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

श्रद्धा कपूर पोस्ट

 

View this post on Instagram

 

पिढ्यानपिढ्या जपलेला पेहराव...साडी पिढ्यानपिढ्या उभारलेला सन्मान...गुढी पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा... गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🤗💫💜 . . 📸 - @shraddhakgalaxy

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरे यांच्याशी लव्ह मॅरेज केलं आहे. आई आणि मावशी मराठी असल्याने श्रद्धाला अतिशय उत्तम मराठी बोलता व लिहिता येते. दरम्यान, श्रद्धा सोबतच अनेक मराठी कलाकार मंडळींनी सुद्धा या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून आपल्या फॅन्सना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.