राहत फतेह अली खान यांच्यावर स्मगलिंगचा आरोप; ED ने बजावली नोटीस
लोकप्रिय गायक राहत फतेह अली खान यांच्यावर स्मगलिंगचा आरोप करण्यात आला आहे.
लोकप्रिय गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांच्यावर स्मगलिंगचा आरोप करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राहत फतेह अली खान गेल्या तीन वर्षांपासून भारतात विदेशी चलनाचा तस्करी (Smuggling Foreign Currency) करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत राहत फतेही अली खान यांनी भारतात अवैधरित्या 3,40000 यूएस डॉलर कमावले आहेत. त्यापैकी त्यांनी 225000 डॉलरची तस्करी केली. फेमा (FEMA) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ED कडून त्याला नोटीस पाठवण्यात आली. त्यात ED ने 2 कोटी 61 लाखांचा हिशोब मागितला आहे. या नोटीसला राहत याने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्यास तस्करी केलेल्या रक्कमेवर 300% दंड भरावा लागेल. हा दंड न भरल्यास भारतात त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल.
यापूर्वी राहत फतेह अली खानवर परदेशी चलनाच्या स्मगलिंगचा आरोप लावण्यात आला होता. 2011 मध्ये त्याला दिल्लीच्या इंदिरा गांदी इंटरनॅशनल एअरपोर्टवर सव्वा लाख डॉलरसह पकडले होते.
बॉलिवूडची अनेक गाणी राहत फतेह अली खान यांच्या सुमधूर आवाजाने लोकप्रिय झाली आहेत. 'रश्के कमर', 'दिल तो बच्चा है जी', 'लागी तुझसे मन की लगन', 'मैं जहां रहूं' आणि 'जग घूमिया' ही त्यापैकीच काही गाणी. त्यांच्या आवाजाचे भारतात प्रचंड चाहते आहेत.