7 Years of Yeh Jawaani Hai Deewani: 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटाला 7 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दीपिका पादुकोण ने रणबीर कपूर सोबतचा खास फोटो चाहत्यांशी केला शेअर

दीपिकाने आपल्या चित्रपटाविषयी आणि शूटिंगदरम्यान च्या आठवणींना उजाळा देत इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील लूकमध्ये तिचा रणबीर कपूर सोबतचा फोटो शेअर केला आहे.

Ranbir and Deepika (Photo Credits: Instagram)

तरुणाईच्या जीवनावर आधारित दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'ये जवानी है दीवानी' आजही अनेकांच्या हृदयात घर करून आहे. लोकांना आजही नैना आणि बनी ही पात्र आपल्या खूप जवळची वाटतात. आज या चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त या चित्रपटातील नैना म्हणजेच दीपिका पादुकोण हीने रणबीर कपूर सोबतचा फोटो शेअर करुन आठवणींना उजाळा दिला. 31 मे 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

दीपिकाने आपल्या चित्रपटाविषयी आणि शूटिंगदरम्यान च्या आठवणींना उजाळा देत इन्स्टाग्रामवर या चित्रपटातील लूकमध्ये तिचा रणबीर कपूर सोबतचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Our very first look test...💝 ‘Yaadein mithai ke dibbe ki tarah hoti hain...Ek baar khula, toh sirf ek tukda nahi kha paoge’-Naina Talwar #7yearsofyehjaawanihaideewani @ayan_mukerji #ranbirkapoor #bunny

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

या फोटोखाली दीपिकाने एक सुंदर पोस्ट केली आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, ""आमच्या दोघांचा पहिला लूक टेस्ट... यादें मिठाई के डब्बे की तरह होती हैं. एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे - नैना तलवार" 'मी त्याला Cheat करताना रंगेहाथ पकडलं' दीपिका पादुकोण हिचा पूर्व रिलेशनशिप बाबत मोठा खुलासा

दीपिकाने ही पोस्ट शेअर करताच अगदी काही मिनिटांतच या पोस्टला 4 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे. त्यांच्या चाहत्यांनी या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा देखील दिल्या.

दीपिका आणि रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील गाणे, डायलॉग्स अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटात दीपिका-रणबीरशिवाय आदित्य रॉय कपूर, कल्कि कोचलिन, एवलिन शर्मा हे देखील प्रमुख भूमिकेत होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif