Jammu and Kashmir: कलम 370 हटविण्याच्या मुद्यावर काय म्हणतायत बॉलिवूडमधील हे कलाकार?
या निर्णयाने सर्वत्र क्षेत्रांत वेगवेगळी प्रतिक्रिया उमटत असून बॉलिवूडमध्येही तसेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्ष मुख्यत्वे मोदी सरकार सामान्य जनतेला रोज नवनवे धक्के देत आहेत. गेले कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला जम्मू-कश्मीरचा (Jammu And Kashmir) कलम 370 हटविण्यासंदर्भात घोषणा केली आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला. त्याचबरोबर जम्मू-कश्मीरपासून लद्दाखला वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिला गेलाय. या निर्णयाने सर्वत्र क्षेत्रांत वेगवेगळी प्रतिक्रिया उमटत असून बॉलिवूडमध्येही तसेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर(Anupam Kher), अभिनेत्री कंगना रनौतसह (Kangana Ranaut) झायरा वसीमने (Zaira Wasim) देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांनी 'कश्मीर'च्या समस्येचे समाधान होण्यास आता सुरुवात झाली आहे, असे म्हटले आहे.
तर अभिनेत्री कंगना रनौत हिने'कलम 370 ला खूप आधीच हटवले पाहिजे होते. हे दहशतवादमुक्त राष्ट्र बनविण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचे चिन्ह आहे. मला हे माहित होतं की या असंभव गोष्टीला केवळ मोदीजीचं पूर्ण करतील. असा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी खूप मोठं धाडस आणि हिंमत लागते. मी निर्णयाचा आदर करते आणि संपुर्ण भारतासहित जम्मू-कश्मीरला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते', अशा शब्दांत तिने या मोदी सरकारचे आणि या निर्णयाचे स्वागत केले आहे.
दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीम हिने 'ही वेळसुद्धा निघून जाईल' अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने नुकतेच बॉलिवूड जगताला रामराम करुन आपल्या मायदेशी पाकिस्तानात परतली आहे.