आजी स्नेहलता पांडे च्या निधनानंतर Ananya Panday ची भावुक पोस्ट (View Post)
Ananya Panday (Photo Credits: Yogen Shah)

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) हिच्या आजीचे म्हणजेच चंकी पांडे (Chunky Pandey) च्या आईचे स्नेहलता पांडे (Snehlata Panday) यांचे काल निधन झाले. यानंतर अनन्या पांडे हिने भावुक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार अनन्या पांडेच्या आजीचे 85 व्या वर्षी निधन झाले. त्यानंतर केलेल्या पोस्टमध्ये अनन्याने आपल्या आजीसोबतच्या काही खास क्षणांचे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोत अभिनेता चंकी पांडे देखील आपल्या आईसोबत दिसत आहे.

अनन्याने पोस्टमध्ये लिहिले की, "रेस्ट इन पावर, माय एंजल. जेव्हा त्यांचा जन्म झाला होता. तेव्हा defected heart valve मुळे त्या जास्त काळ जगू शकणार नाहीत, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण ती जगली. 85 वर्षापर्यंत ती दररोज काम करत होती. रोज सकाळी 7 वाजता ती आपल्या कामासाठी  बाहेर पडत होती. मला जे आवडतं ते करण्यासाठी तिने मला नेहमीच प्रोत्साहित केले. तिच्या ऊर्जेत आणि प्रकाशात मी मोठी झाले. त्याबद्दल मी नेहमीच आभारी असेन. पकडण्यासाठी तिच्याकडे सर्वात मऊ हात होते. ती सर्वात छान पायाची मालिश करायची. ती मला हसवण्यात कधीही असफल झाली नाही." (Ananya Panday Hot Photos: लेहंगा चोली मधील अनन्या पांडे चा हॉट अवतार; पहा फोटोज)

पहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

पुढे तिने लिहिले की, "ती आमच्या कुटुंबाचा जीव होती. तुझ्यावर आम्ही इतकं प्रेम करतो की तुला विसरणे शक्य नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे." दरम्यान, अनन्या तिच्या हाट अवतारामुळे कायम चर्चेत असते. स्टुटंड ऑफ द इयर 2, खाली पीली यांसारख्या सिनेमातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.