अमिताभ बच्चन-आयुष्मान खुराना यांच्या 'गुलाबो सिताबो' सिनेमावरही लॉकडाऊनचा परिणाम; Amazon Prime वरुन 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
त्यामुळे येऊ घातलेल्या अनेक सिनेमांच्या प्रदर्शनामध्ये मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे सिनेमांचे शूटिंग बंद असून सिनेमागृह देखील बंद आहेत. त्यामुळे येऊ घातलेल्या अनेक सिनेमांच्या प्रदर्शनामध्ये मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही सिनेमे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा 'गुलाबो सिताबो' (Gulabo Sitabo) सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. शूजित सिरकार (Shoojit Sircar) दिग्दर्शित गुलाबो सिताबो हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर (Amazon Prime Video) प्रदर्शित केला जाणार आहे.
लॉकडाऊनमुळे गुलाबो सिताबो हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकत नाही. त्यामुळे अॅमेझॉन प्राईमवरुन 12 जून रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या संदर्भात माहिती देताना अॅमेझॉन प्राईम इंडियाचे प्रमुख विजय सुब्रमण्यम यांनी Deadline शी बोलताना सांगितले की, "आम्ही आमच्या ग्राहकांच्या इच्छा लक्षात घेऊन काम करतो. गुलाबो सिताबो हा अत्यंत उत्तम सिनेमा असल्याने अॅमेझॉन प्राईमवर त्याचा प्रीमियर करताना आम्ही फार आनंदी आहोत. उत्तमोत्तम सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी हे आमचे पहिले पाऊल आहे. याद्वारे आम्ही उत्तम सिनेमाचा आनंद घरबसल्या प्रेक्षकांना देणार आहोत." (अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'गुलाबो सिताबो' या चित्रपटातील हा लूक बघून तुम्हीही व्हाल अचंबित)
पूर्वी 'गुलाबो सिताबो' सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र याबद्दल मला फारसं माहित नाही, अशी प्रतिक्रीया दिग्दर्शक शूजित सरकार यांनी दिली होती. परंतु, आता हा जगभरातील 200 देशांत प्रदर्शित होणारा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरणार आहे.