Tomatoes, Stones Pelted At Allu Arjun’s Residence: अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील घरावर हल्ला; हल्लेखोरांनी टोमॅटो, दगडफेक करत केले नुकसान

ज्यामध्ये आंदोलक अभिनेत्याच्या घरासमोर निदर्शने करत आहेत. त्यांनी येथे प्रचंड गोंधळ घातला आणि घराबाहेरील फुलांच्या कुंड्या फोडल्या.

Tomatoes, Stones Pelted At Allu Arjun’s Residence (फोटो सौजन्य -IANS)

Tomatoes, Stones Pelted At Allu Arjun’s Residence: पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) च्या समस्या संपण्याचं नाव घेत नाहीयेत. हैदराबादमधील सध्या थेएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेच्या मृत्यू झाल्यानंतर अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीर मंजूर करण्यात आला. मात्र, आता अभिनेत्याला त्याच्या निवासस्थाना बाहेर त्रास सहन करावा लागत आहे. उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी रविवारी संध्याकाळी अल्लू अर्जुन यांच्या घरी निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी पीडित कुटुंबियांना एक कोटी रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी अभिनेत्याच्या घरावर टोमॅटो आणि दगडफेक केली. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत 8 जणांना ताब्यात घेतले. घटनेच्या वेळी अल्लू अर्जुन घरी उपस्थित नव्हता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अभिनेत्याच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.

आंदोलकांनी अभिनेत्याच्या घरावर फेकले टोमॅटो आणि दगड -

या प्रदर्शनाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये आंदोलक अभिनेत्याच्या घरासमोर निदर्शने करत आहेत. त्यांनी येथे प्रचंड गोंधळ घातला आणि घराबाहेरील फुलांच्या कुंड्या फोडल्या. तथापी, अभिनेत्याने पोस्ट शेअर करून लोकांना गैरवर्तन न करण्याची विनंती केली होती. दरम्यान, अल्लू अर्जुनने ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अपशब्द वापरणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आदर आणि सकारात्मकता राखण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा -Pushpa 2 Stampede: आईच्या मृत्यूनंतर संध्या थिएटरमध्ये स्क्रिनिंग दरम्यान चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या 9 वर्षांचा मुलगा ब्रेन डेड घोषित)

अल्लू अर्जुनचे चाहत्यांना आवाहन -

दरम्यान, अल्लू अर्जुनने आपल्या सर्व चाहत्यांना आवाहन केले की, त्यांनी नेहमी जबाबदारीने आपल्या भावना व्यक्त कराव्यात. फेक आयडी आणि फेक प्रोफाईलद्वारे स्वतःला माझे चाहते म्हणून चुकीची माहिती देणाऱ्या आणि अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. मी चाहत्यांना विनंती करतो की, अशा पोस्ट्सशी कनेक्ट होऊ नका. (हेही वाचा -Pushpa 2 Premiere Tragedy: हैदराबाद येथे झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या श्री तेज यांच्याबाबत अल्लू अर्जुनचे वक्तव्य, म्हणाले- 'मी त्याच्या प्रकृतीबद्दल अत्यंत चिंतेत आहे')

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेत्याला अटक -

अल्लू अर्जुनला हैदराबाद येथील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अटक करण्यात आली होती. अभिनेत्याला तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. कारागृह प्रशासनाकडून जामीन आदेश मिळण्यास विलंब झाल्यामुळे त्यांना एक रात्र तुरुंगात काढावी लागली. अल्लू अर्जुनची दुसऱ्या दिवशी सकाळी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती.