Aditya Narayan and Shweta Agarwal’s Tilak Ceremony: आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांचा तिलक सोहळा संपन्न; पहा फोटोज आणि व्हिडिओज
लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिच्या लग्नानंतर आता गायक आदित्य नारायण बोहल्यावर चढायला सज्ज झाला आहे. 1 डिसेंबर रोजी आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल सोबत विवाहबद्ध होणार आहे. त्यापूर्वी तिलक समारंभाचे फोटोज आणि व्हिडिओज समोर आले आहेत.
बॉलिवूडमध्ये लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लोकप्रिय गायिका नेहा कक्कर हिच्या लग्नानंतर आता गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) बोहल्यावर चढायला सज्ज झाला आहे. 1 डिसेंबर रोजी आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) सोबत विवाहबद्ध होणार आहे. दरम्यान, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अलिकडेच आदित्यचा तिलक समारंभ पार पडला. त्याचा एक क्युट व्हिडिओ समोर आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. (Aditya Narayan Wedding: येत्या 1 डिसेंबरला आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल अडकणार विवाहबंधनात, पंतप्रधान मोदी, अमिताभ बच्चन सह अनेक दिग्गजांना दिले आमंत्रण)
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांच्या लग्नाची तयारी, धामधूम सुरु झाली आहे. काल आदित्यच्या घरी तिलक समारंभ पार पडला. या सोहळ्याचा व्हिडिओ आदित्यने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तसंच श्वेता सोबतचा एक रोमांटिक फोटो देखील शेअर केला आहे. यात आदित्यने श्वेताला अगदी जवळ घेतले आहे आणि दोघेही मनमुराद हसत आहेत. या फोटोत आदित्यने डार्क ब्लू रंगाचा कुर्ता आणि श्वेताने नारंगी रंगाचा लेहंगा घातला आहे.
पहा फोटो:
आदित्यच्या तिलक समारंभाचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात उदित नारायण आणि त्यांची पत्नी नारायण झा देखील दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत उदित नारायण आणि त्यांची पत्नी डान्स करताना दिसत आहेत.
पहा व्हिडिओ:
उदित नारायण यांनी कोईमोई ला दिलेल्या मुलाखतीत आदित्यच्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की, कोविड-19 मुळे लग्न 1 डिसेंबर रोजी मंदिरात होणार आहे. त्यात केवळ 50 लोक सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी 2 डिसेंबर रोजी पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्रँड रिसेप्शचे आयोजन करण्यात येईल. यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.