Priyanka Chopra Dance: ब्लॅक बिकनीत देसी गर्लचे ठुमके, अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या बाथरुम डान्सचा सोशल मिडीयावर कहर
Priyanka Chopra | (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री प्रियंका चोप्राचा गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नसला तरी बॉलिवूडची ही देसी गर्ल (Desi Girl) कायम चर्चेत असते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रियंका तिच्या आयुष्यातील अपडेट्स देताना दिसते. नुकतीच प्रियंका एक गोंडस बाळाची आई झाली असुन तिच्या बाळाचे, तिचा पती निक जोनस (Nick Jonas) तसेच तिच्या कुटुंबा बरोबरचे फोटोज शेअर करते. पण सध्या प्रियंका चर्चेत आहे ते तिच्या ब्लॅक बिकनीतील डान्समुळे. प्रियंकाचा इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यात तिने ब्लॉक बिकनी परिधान केली असुन ब्लॅक ग्लासेस मॅच लावत ठुमके लगावले आहेत. प्रियंकाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण हा फक्त बिकनी डान्स नसुन तिने तिच्या बाथरुम मधील व्हिडीओ शेअर केला आहे.

 

या व्हिडिओमध्ये (Video) प्रियंका तिच्या बाथरुमध्ये (Bathroom) आहे आणि तिने ब्लॅक बिकनी (Black Bikini) परिधान केलेली आहे. तसेच लुक बॅलेन्स (Look Balance) करण्यासाठी ब्लॅक ग्लासेस (Black Glasses) आणि प्रॉप (Prop) म्हणून हातात हेअर कंडिशनर (Hair Conditioner) धरलं आहे. तसेच ते कंडिशनर ती तिच्या केसांवर लावताना दिसत आहे. प्रियंकाच्या या व्हिडीओने सोशल मिडीयावर (Social Media) सध्या धुमाकुळ घातला आहे. प्रियंकाच्या चाहत्यांची तसेच नेटकऱ्यांची या व्हिडीओला जोरदार पसंती दिसून येत आहे. (हे ही वाचा:- Taapsee Pannu On Coffee With Karan: 'कॉफी विथ करण' मध्ये आमंत्रित न केल्याबद्दल तापसी पन्नूचे दिले उत्तर, म्हणाली...)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jerry x Mimi 😍 (@jerryxmimi)

 

प्रियंका चोप्रचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट (Bollywood Movie) स्काय इज पिंक (Sky Is Pink) हा नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज झाला होता. त्यापूर्वी बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani), दिल धडकने दो (Dil Dhadakne Do) या सारखे सुपरहिट चित्रपट केलेले आहेत. तर लवकरच देसी गर्ल (Desi Girl) बॉलिवूडमध्ये (Bollywood) कम बॅक (come Back) करणार असल्याची चर्चा आहे. तरी प्रियंकाच्या चाहत्यांना तिच्या बॉलिवूड सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत.