Indian 2: अभिनेता कमल हसन यांच्या आगामी चित्रपट इंडियन २चा पोस्टर रिलीज, या दिवशी ट्रेलर प्रदर्शित

दक्षिण आणि बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कमल हसन इंडियन २ या चित्रपटात झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटाची अपडेट समोर आली आहे.

Indian 2: अभिनेता कमल हसन यांच्या आगामी चित्रपट इंडियन २चा पोस्टर रिलीज, या दिवशी ट्रेलर प्रदर्शित
Indian 2 Trailer PC TW

Indian 2:  दक्षिण आणि बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कमल हसन इंडियन २ या चित्रपटात झळकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. या चित्रपटाची अपडेट समोर आली आहे.  त्यामुळे चाहत्यांनी उत्सुकता दर्शवली आहे.  निर्मात्यांनी आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज कधी रिलीज होईल या संदर्भात माहिती दिली.  या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले असून त्याचे संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. लवकरच या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  (हेही वाचा- 'थलपथी' विजयच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान घडला अपघात; चाहत्याच्या हाताला लागली आग (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहेत. लायका प्रोडक्शनच्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. चित्रपटाचे काही म्युझिक सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले.  हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर २५ जून रोजी मंगळवारी सोशल मीडियावर प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता कमल हसन यांच्या चाहता वर्ग खुप मोठा आहे. चाहत्यांनी इंडियन २ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. कमल हसन या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून झळकणार आहे. कमल हसन यांचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन सारखे सुपरस्टार देखील झळकणार आहे.

 

(The above story first appeared on LatestLY on Jun 23, 2024 01:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).