ट्रॅफिक मधील वेळ वाचवण्यासाठी खिलाडी अक्षय कुमार ने घाटकोपर ते वर्सोवा केला 'मेट्रो'तून प्रवास, पाहा व्हायरल व्हिडिओ
गुगल मॅपवरील ट्रॅफिकची स्थिती पाहून वेळ वाचविण्यासाठी त्याने चक्क मेट्रोने (Metro) प्रवास केला आहे. 18 नोव्हेंबरला रात्री 10च्या सुमारास अक्षयने हा व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्याने आपल्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक राज यांच्यासह मेट्रोतून प्रवास केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) कधी काय करेल याचा काही नेम नाही. त्याचे अॅक्शन स्टंट्स जितके चर्चेत असतात तितकेच त्याचे कारनामेही. नुकताच त्याने त्याच्या सोशल अकाऊंटवरुन त्याच्या नवीन कारनाम्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षय कुमारला घाटकोपरवरुन वर्सोव्याला जायचे होते. यावेळी गुगल मॅपवरील ट्रॅफिकची स्थिती पाहून वेळ वाचविण्यासाठी त्याने चक्क मेट्रोने (Metro) प्रवास केला आहे. 18 नोव्हेंबरला रात्री अक्षयने हा व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्याने आपल्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शक राज यांच्यासह मेट्रोतून प्रवास केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.
खिलाडी अक्षय कुमार आपल्या आगामी 'गुड न्यूज' चित्रपटासाठी घाटकोपरमध्ये शूटिंग करत होता. बुधवारी रात्री शूटिंग संपवून तो वर्सोवाला जायला निघाला. मात्र त्याने त्याच्या मोबाईलमध्ये ट्रॅफिकची स्थिती बघितली. ज्यात 2 तास वेळ दाखवत होता. त्यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक राज यांनी त्याला मेट्रो ने प्रवास करण्याची कल्पना सुचवली. अक्षयला ही कल्पना आवडली. आणि मग सुरु झाला त्यांचा मेट्रो प्रवास...
अक्षय कुमारचा व्हिडिओ:
त्याच्या या व्हिडिओतून हा मेट्रो प्रवास किती एन्जॉय करतोय हे दिसत आहे. मात्र त्यांच्या चाहत्यांनी मात्र त्याच्या या प्रवासाला संमिश्र प्रतिक्रिया दिली असून असा व्हिडिओ शेअर करुन मेट्रोमुळे वृक्षांची होणारी कत्तल आणि आरे कॉलनीचा प्रश्न यांचे तुम्ही समर्थन करताय का असा सवाल केला आहे.
हेही वाचा- Mumbai Metro ला अमिताभ बच्चन यांचा पाठिंबा, नेटकऱ्यांनी सोशल मीडियात दर्शवला विरोध
18 नोव्हेंबरला मुंबईत पडणा-या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर भयंकर अशी वाहतुक कोंडी झाली होती. त्यामुळे मेट्रो तून वर्सोवाला जाण्याची ही शक्कल आपल्या कामी आली असून अवघ्या 20 मिनिटांत आपण वर्सोव्याला पोहोचलो अशी प्रतिक्रियाही अक्षयने दिली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2019 09:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

