'कुछ कुछ होता है' सिनेमाला 20 वर्ष पूर्ण ; सिनेमाविषयी काही रंजक गोष्टी
कुछ कुछ होता है (Photo Credit : Twitter)

90 च्या दशकात सुपर डुपर हिट झालेला 'कुछ कुछ होता है' या सिनेमाला आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. इतक्या वर्षानंतरही या सिनेमातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. सिनेमातील गाणी, डायलॉय तर विशेष लोकप्रिय आहेत. राहुल, अंजली आणि टिना या पात्रांनी मनात स्थान निर्माण केले. पण यांच्या विषयीच्या काही खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का? सिनेमाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...

# टिना या भूमिकेसाठी रानी मुखर्जी ही करण जोहरची पहिली चॉईस नव्हती. ट्विंकल खन्नाला डोक्यात ठेवून ही व्यक्तीरेखा लिहिण्यात आली होती. इतकंच नाही तर ट्विंकलचे निक नेम टिना असल्याने या व्यक्तीरेखेलाही हेच नाव देण्यात आले होते. पण ट्विंकलने ही भूमिका नाकारल्यानंतर ती राणी मुखर्जीला मिळाली.

# तेव्हा रानी मुखर्जी फक्त १९ वर्षांची होती आणि या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट सपोर्टींग अॅक्टरेसचा पुरस्कार मिळाला.

# तर सलमान खानच्या अमन मेहरा या भूमिकेसाठी पहिल्यांदा सैफ अली खानला विचारणा झाली होती.

# कुछ कुछ होता है मधील प्रसिद्ध डायलॉग 'तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ' हा डब करण्यात आला होता. हा कैवल्य छेडा या बालकलाकाराचा आवाज आहे.

# दिल वाले दुल्हनिया लै जाएँगे मध्ये साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केल्यानंतर राहुल आणि अंजली या भूमिकांसाठी शाहरुख आणि काजोल ही करण जोहरची पहिली चॉईस होती.

# रानी मुखर्जीचा आवाज थोडा घोगरा असल्याने तिचा आवाज डब केला जावा अशी करणची इच्छा होती.

# 'ये लडका है दिवाना' या गाण्याच्या वेळी काजोलचे सायकलवरचे नियंत्रण सुटल्याने ती तोंडावर आपटली. या अपघातामुळे तिच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्याचबरोबर काही तिची स्मृतीही गेली होती.

# 'साजन जी घर आए..' या गाण्याच्या शूटिंगवेळी सलमान खान आणि काजोल हे एकमेकांशी बोलत नव्हते.