Photo Credit- X

Bigg Boss Marathi 5: कलर्स मराठीकडून आजच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli)आणि अंकिता वालावलकर(Ankita Valawalkar) यांच्यामधील वाद पुन्हा एकदा पेटलेला दिसतोय. अंकिता सुरजला बोलल्यामुळे वाद झाला असल्याचे बोलले जात आहे. प्रोमोमध्ये अंकिता सूरजला विचारते की 'तू खुर्चीवर सुद्धा सांडवलं आहेस का?' त्यावर निक्की अंकिताला म्हणते की "जाऊदे ना त्याला परत टोकणार आहेस का?". त्यावर अंकिता सुरजला चिडून म्हणते की, "ती संगेल ते ऐक." (हेही वाचा: Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात गश्मीर महाजनी आणि प्राजक्ता माळीची एन्ट्री; लुडोवर डान्समध्ये सदस्यांनी केली धमाल-मस्ती (Watch Video)

त्यावर पुन्हा एकदा निक्की बोलते की, "प्रत्येक गोष्टीमध्ये सूरजला टोमणा मारायचा आणि टोकायचं, तुम्ही त्याला घर देताय म्हणून त्याच्यावर अत्याचार करू नका." त्यानंतर बाथरुममध्ये जाऊन अभिजीत पॅडी दादांना म्हणतो की, "सारखं सारखं त्याला टोकणं चांगलं नाही. त्याला ते आवडत नाही." यावर पॅडी दादा त्याला म्हणतात की निक्कीच्या मतांशी तू सहमत आहेस तर.

 सूरजसाठी निक्की आणि अंकिता भिडल्या 

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीचा 5 वा सिझन त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. येणारा आठवडा बिग बॉस मराठी सिझन ५चा शेवटचा आठवडा असणार आहे. 6 ऑक्टोबरला यंदाच्या सिझनचा फिनाले आयोजित करण्यात आला आहे. यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये नवीन ट्विस्ट आणि मनोरंजन पाहायला मिळत आहे. शनिवारच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरातील जुण्या सदस्यांची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळाली. विकेंडला बिग बॉस मराठीतच्या घारामध्ये अभिजीत बिचुकले, अनिल थत्ते आणि राखी सावंत यांची ग्रँड एन्ट्री पाहायला मिळाली होती. त्यादरम्यान प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन देखील झाले होते.