Bhojpuri Actress Monalisa in Bigg Boss 14? भोजपुरी हॉट अभिनेत्री मोनालिसा ने बिग बॉस 14 मध्ये गेस्ट एंंट्री करण्याच्या चर्चांवर दिलं हे उत्तर

मोनालिसाच्या सोशल मीडियावरील फोटोवर अनेक फॅन्स कमेंट करुन तिला याबाबत विचारत आहेत.

Bhojpuri Actress Monalisa in Bigg Boss 14 (Photo Credits: Facebook)

Bhojpuri Actress Monalisa in Bigg Boss 14: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही मागील काही दिवसांंपासुन पुन्हा चर्चेत आली आहे, तिचे अनेक फॅन्स तिची जुनी हॉट गाणी (Monalisa Hot Video), तिच्या सोशल मीडियावरील फोटो, डान्सचे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) करत असतात, तिची ही पॉप्युलॅरिटी पाहता तिला यंदाच्या बिग बॉस 14 व्या सीझन मध्ये गेस्ट एंट्री दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. मोनालिसाच्या सोशल मीडियावरील फोटोवर अनेक फॅन्स कमेंट करुन तिला याबाबत विचारत आहेत या सगळ्या फॅन्स ना मोनालिसाने उत्तर दिले आहे.मोनालिसाने या चर्चा खोट्या असुन आपला शोमध्ये सहभाग घेण्याचा काहीही विचार नाहीये किंंबहुना त्याविषयी शोच्या मेकर्स कडुनही काही विचारणा झालेली नाही असेही तिने सांंगितले आहे.भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चा पावसात भिजतानाचा 'हा' हॉट आणि बोल्ड डान्स पाहुन व्हाल अवाक

बिग बॉस 14 च्या सीझन मध्ये जुने स्पर्धक जसे की हिना खान, सिद्धार्थ शुक्ला सुद्धा परत पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. यासोबतच मोनालिसाच्या पण नावाची चर्चा होती मात्र आता मोनालिसाने थेट नकार दिल्याने तिच्या फॅन्सची काहीशी निराशा झाली असणार.Monalisa Hot Bhojpuri Song: मोनालिसा ने Bikini घालुन समुद्रात केलेला हा हॉट रोमान्स लावतोय पाण्यातही आग (Watch Video)

मोनालिसा पोस्ट

दरम्यान मोनालिसाने बिग बॉस च्या 10 व्या सीझन मध्ये स्पर्धक म्हणुन एंट्री घेतली होती तेव्हा अन्य स्पर्धक मनु पंंजाबी सोबत तिची मैत्री बरीच चर्चेत आली होती. याच बिग बॉसच्या घरात मोनालिसाने आपला बॉयफ्रेंड विक्रांंत सिंंह सोबत सात फेरे घेतले होते. आता सध्या ती आपले लग्नजीवन एन्जॉय करताना पाहायला मिळतेय. तिने सिनेमांंमध्ये पुन्हा काम सुरु करावे यासाठी तिचे फॅन्स तिला अनेकदा कमेंटसमधुन सुचवत असतात.