Ram Gopal Varma: चंद्राबाबू नायडू आणि कुटुंबाविरोधात पोस्ट करण भोवल! आंध्रा पोलीस राम गोपाल वर्मा यांना अटक करण्याच्या तयारीत; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Ram Gopal Varma

Ram Gopal Varma: चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा ()यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या अटकेसाठी आंध्र प्रदेश पोलिसांचे (Andhra Pradesh Police) एक पथक त्याच्या हैदराबाद येथील घरी पोहोचल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandra Babu Naidu) आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात पोस्ट केल्याबद्दल चौकशीसाठी ते हजर झाले नाही आता त्यांना अटक करण्यात येत आहे. (हेही वाचा: Ram Gopal Varma Summoned: मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे मॉर्फ फोटो शेअर केल्याबद्दल राम गोपाल वर्मा यांना आंध्र प्रदेश पोलिसांचे समन्स)

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश पोलिसांचे पथक राम गोपाल वर्मा यांच्या घरी पोहोचले. मात्र पोलिसांनी ते तेथे उपस्थित नसल्याचे दिसले. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात पोस्ट केल्याबद्दल चौकशीसाठी सलग दुसऱ्यांदा तपास अधिकाऱ्यांसमोर न आल्याने पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा कोईम्बतूरला पळून गेल्याचे समजते आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

राम गोपाल वर्मा हे नेहमीच राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट विधाने करत असतात. ते वायएसआर काँग्रेस पक्षाचे समर्थक आहेत. त्यामुळे ते चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पक्षाविरोधात वक्तव्ये करत असतात. राम गोपाल वर्माचा 'व्यूहम' हा चित्रपट मार्चमध्ये रिलीज झाला होता. 2009 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू आणि त्यांचा मुलगा जगन मोहन रेड्डी यांच्या राजकीय प्रवासाभोवती हा चित्रपट फिरतो. हा चित्रपट गेल्या वर्षी आंध्र प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रदर्शित होणार होता, मात्र वादामुळे चित्रपट पुढे ढकलावा लागला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. चित्रपट चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाची प्रतिमा खराब करण्यासाठी बनवला गेला असल्याचे सांगण्यात आले होते. वादांच्या दरम्यान, राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाचे प्रमोशन करताना अनेक सोशल मीडिया पोस्ट केल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री आणि मंत्री लोकेश यांच्याविरोधात आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या होत्या. या दरम्यान त्यांनी एक मॉर्फ केलेला फोटो देखील पोस्ट केला होता. ज्यावर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

वादानंतर, 13 डिसेंबर 2023 रोजी, चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने यू प्रमाणपत्र दिले, त्यानंतर हा चित्रपट 2 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झाला. 11 नोव्हेंबर रोजी राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

टीडीपी (तेलुगु देसम पार्टी) विभागीय सचिव रामलिंगम यांनी 11 नोव्हेंबर रोजी चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात मड्डीपाडू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. राम गोपाल वर्मा यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कलम 67 आणि बीएनएस कलम 336 (4), 352 (2) अंतर्गत तक्रार नोंदवून तपास सुरू करण्यात आला. मात्र, राम गोपाल वर्मा यांनीही गेल्या आठवड्यात पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी चार दिवसांचा अवधी मागितला होता.