लोकप्रिय युट्यूबर Dansih Zehen चा रोड अपघातात मृत्यू; विकास गुप्ताने शेअर केली भावनिक पोस्ट
लोकप्रिय युट्यूबर (Youtuber) तसेच MTV Ace of Space मधील स्पर्धक दानिश जेहन (Dansih Zehen) या युवकाचा एका रोड अपघातात मृत्यू झाला आहे.
Danish Zehen Passed Away : लोकप्रिय युट्यूबर (Youtuber) तसेच MTV Ace of Space मधील स्पर्धक दानिश जेहन (Dansih Zehen) या युवकाचा एका रोड अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दानिश आज सकाळी एक लग्न आटोपून परतत होता, त्यावेळी हा अपघात झाला आहे. या अपघातात दानिशचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मुंबईमधील वाशी परिसरात घडली आहे. दानिशचे वय अवघे 21 वर्षे होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दानिश त्याचे व्हिडीओ, ब्लॉग्स आणि पोस्ट्स यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचला होता.
RIP. You will be always missed. May God give strength to your family. #DanishZehen
दानिशने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जस्टिन बीबरच्या एका हेअरस्टाईलने केली होती. आता तर ही हेअरस्टाईल जेहन हेअरस्टाईल म्हणून ओळखली जाते. दानिशच्या चाहत्यांना ती हेअरस्टाईल प्रचंड आवडली होती. याचसोबत दानिशच्या अनेक गोष्टी लोक फॉलो करत होते.
View this post on Instagram
Dekhte hu mujhko tujhse pyaar hogaya #coolestbadboi
A post shared by Danish Zehen ♠️ (@danish_zehen) on
युट्यूबसोबतच दानिश इन्स्टाग्रामवरही अतिशय लोकप्रिय होता. दानिशच्या एका पोस्टला तब्बल 90K पेक्षाही जास्त लाईक्स मिळत असत. अशाप्रकारे दानिशच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे त्याचा चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. त्याचे चाहते ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली अर्पित करत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)