Tesla Layoffs: टेस्लामध्ये पुन्हा कर्मचारी कपात; इंजिनीयर, सॉफ्टवेअर आणि सेवा विभागांमधील कर्मचारी गमावणार नोकरी
अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क यांनी आव्हानात्मक बाजारपेठ आणि कंपनीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी सॉफ्टवेअर, सेवा आणि अभियांत्रिकी विभागांमध्ये कर्मचारी कपातीची आणखी एक मालिका सुरू केली आहे.
Tesla Layoffs: इलॉन मस्क (Elon Musk)यांनी इलेक्ट्रिक वाहन असलेल्या टेस्ला कंपनीत पुन्हा एकदा टाळेबंदीच्या दुसऱ्या फेरीची घोषणा केली आहे. यात इंजिनीयर, सॉफ्टवेअर आणि सेवा विभागांमधील कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे. ज्यामुळे विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. इलॉन मस्कच्या टेस्ला या ईव्ही कार(EV Car)उत्पादन कंपनीमधून अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर आणि सेवा विभागातून कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. इलॉन मस्कने ईव्ही कार(EV Car)उत्पादन कंपनीमध्ये कर्मचारी कपात करणे सुरू ठेवले आहे. कंपनीने आव्हानात्मक बाजारपेठेत टेस्लाच्या घसरत्या विक्रीमुळे कामकाज सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न म्हणून टेस्लामध्ये टाळेबंदी करण्यात येत आहे. (हेही वाचा:Tesla Layoffs: टेस्लाच्या वरिष्ठ व्यवस्थापनासह 500 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार; Elon Musk करत आहेत प्लानिंग)
MSN च्या रिपोर्टनुसार, टेस्लाने कामगारांची संख्या कमी करून कंपनीच्या खर्चात कपात आणि ऑपरेशनल सुधारणांवर भर देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सेवा आणि अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना यामुळे काढून टाकण्यात आले आहे. इलॉन मस्क यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या बुवया उंचावल्या आहेत. कारण, अशा विभागांमध्ये नोकर कपात करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने कंपनी आणखी चांगेल काम करू शकते.
या ऑटोमोटिव्ह कंपनीतील कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार दरम्यान ईमेलद्वारे कामावरून कमी करण्याबद्दल सूचित केले गेले. टेस्ला कारची घसरती विक्री आणि बाजारात वाढलेली स्पर्धा यामुळे टेस्ला सध्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे. हा निर्णय टेस्लाने युनायटेड स्टेट्समधील त्याच्या पाच पैकी तीन मॉडेल्सच्या किंमती कपातीच्या अलीकडील घोषणेला अनुसरून घेतला आहे.