Bajaj Pulsar 250 Launch: बजाज पल्सर F250 आणि N250 भारतात विक्रीसाठी सज्ज
बजाज पल्सर ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित मोटारसायकलींपैकी एक आहे आणि आता ती संपूर्ण नवीन Bajaj Pulsar 250 भारतात लॉन्च होणार आहे.
2021 Bajaj Pulsar F250 आणि Bajaj Pulsar N250 आज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आले आहेत. बजाज ऑटोच्या पल्सरने गेल्या दोन दशकांत भारतात मोठ्या प्रमाणावर - आणि निष्ठावंत - फॅन फॉलोइंग तयार केले आहे. बजाज ऑटोने अलीकडच्या काळात नवीन पल्सर लाँच करण्याआधी मोठ्याप्रमाने प्रचार केला, आणि यापैकी एका बाईकचा टीझर देखील जारी केला आहे. दोन्ही नवीन बाईक गेल्या काही आठवड्यांत भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग करताना दिसल्या आहेत. अखेर या बहुप्रतिक्षित बाइक्स भारतात विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. (हे ही वाचा TVS Apache RTR 160 4V: टिव्हीएस मोटरने Apache RTR 160 4V बाइक केली लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये.)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)