पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदू बांधवांना दिल्या होळी सणाच्या शुभेच्छा
याच दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हिंदूंना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan Prime Minister) इम्रान खान (Imran Khan) यांनी हिंदूंना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पाकिस्तानातील हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी इम्रान खान यांनी खास ट्विट केले. या ट्विट मध्ये त्यांनी लिहिले की, "सर्व हिंदू बांधवांना होळीच्या शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना ही होळी आनंदाची आणि शांततेची जावो, हीच प्रार्थना."
14 फेब्रुवारीला पाकिस्तानने केलेल्या दहशतावादी हल्ल्यात CRPF चे 40 हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्याचे प्रत्तुतर देताना भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारीला पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची स्थळे उद्धवस्त केली. त्यानंतर पुन्हा 27 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या तीन विमानांनी भारताच्या सीमांचे उल्लंघन केले. त्यावेळेस पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडण्यात भारताला यश आले. मात्र भारतीय वायुसेनेचे पायलट अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. मात्र 1 मार्च रोजी त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले आहेत.